व्हिडिओ: कान्समध्ये फोटोसेशन सोडून प्रियंकाचा ड्रेस नीट करू लागला निक

बी टाऊन
Updated May 19, 2019 | 10:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी

‘मेट गाला २०१९’नंतर प्रियंका चोपडा आणि पती निक जोनास पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता निमित्त आहे कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ चं... प्रियंकानं यंदा पहिल्यांदाच कान्समध्ये डेब्यू केलाय.. पाहा त्यांचा खास अंदाज..

Priyanka Chopra and Nick Jonas
प्रियंका चोपडा आणि निक जोनासचा रोमँटिक अंदाज  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: यंदा पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू करणाऱ्या देसी गर्लनं सर्वांची नजर खिळवून ठेवली. ‘मेट गाला २०१९’मध्ये प्रियंकाचा ड्रेस आणि लूक वरून तिची खिल्ली उडवली गेली होती. मात्र आता कान्समधील तिचा लूक प्रेक्षकांना खूप भावला आहे. विशेष म्हणजे अगदी रॉयल अंदाजात आपला पती निक जोनाससोबत रेड कार्पेटवर दिसलेल्या प्रियंका-निकचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात दोघांमधील रोमँटिक केमेस्ट्री बघायला मिळतेय.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा नुकतीच पती निक जोनास सोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली. यावेळी ती लव्हेंडर कलरच्या फिश स्केल सारख्या आऊटफिटमध्ये दिसली. तर तिचा पती निक जोनास काळ्या रंगाच्या फॉर्मल आऊटफिटमध्ये दिसला.

 

 

या रोमँटिक कपलचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात प्रियंकासोबत फोटोसेशन करण्यासाठी निक तिचं नाव घेतोय. सोबतच प्रियंकाचा ड्रेस निट करतांनाही तो दिसून येतोय. प्रियंकाचा ड्रेस समोरून जरासा विस्कटला होता ते दिसताच लगेच निकनं ड्रेस निट केला.

 

 

निकला असं करतांना बघून तिथं उपस्थित फॅन्स आश्चर्यचकीत झाले. स्टार कपलचा हा रोमँटिक अंदाज फॅन्सनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओमधील प्रियंका-निकचा निकचा ही रोमँटिक अदा सोशल मीडियावरही पसंत केली जात आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियंका पहिल्या दिवशी काळ्या रंगाच्या शिमरिंग ड्रेसमध्ये अवतरली होती. त्या पोशाखात सुद्धा प्रियंका स्टनिंग दिसत होती.

 

 

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच वर्षानंतर प्रियंका बॉलिवूडमध्ये ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातून परत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रियंकासोबत अभिनेता फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. तसंच या चित्रपटात अभिनेत्री झायरा वसीमची सुद्धा प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलंय.

दरम्यान, ‘मेट गाला २०१९’मधील प्रियंकाचा लूक प्रेक्षकांना आवडला नव्हता. या लूकवरून अनेक मीम्स व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर तिच्या लूकची खिल्ली उडवली गेली होती. पण आता कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या लूकमुळे प्रेक्षक आनंदी झाले आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
व्हिडिओ: कान्समध्ये फोटोसेशन सोडून प्रियंकाचा ड्रेस नीट करू लागला निक Description: ‘मेट गाला २०१९’नंतर प्रियंका चोपडा आणि पती निक जोनास पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता निमित्त आहे कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ चं... प्रियंकानं यंदा पहिल्यांदाच कान्समध्ये डेब्यू केलाय.. पाहा त्यांचा खास अंदाज..
Loading...
Loading...
Loading...