मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी प्रियंका चोपडाने (Priyanka Chopra) चंदेरी दुनियातील गडद अंधाराविषयी वक्तव्य केलं होतं. तिच्या या विधानामुळे बॉलिवूडमध्ये (Bollywood)खळबळ माजली होती. प्रियंका म्हणाली की एक काळ असा होता की, बॉलिवूडमध्ये मला वेगळं पाडलं जात होतं. बी-टाऊनमध्ये गटबाजी चालत असल्याचं ती म्हणाली होती. परंतु ज्या बॉलिवूडमुळे तिला ओळख मिळाली त्या बॉलिवूडची पोलखोल प्रियंका का करत आहे? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ( Worked in Bollywood; Then why did Priyanka Chopra criticize now?)
अधिक वाचा : हनुमानाची कशी कराल पूजा; जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व,नियम
प्रियंका तिचा को-स्टार रिचर्ड मेडनसोबत सिटाडेल या वेबसीरिजचं प्रमोशन करत आहे. माध्यमाशी बोलताना देशी गर्ल प्रियंकाला विचारण्यात आलं की, इतक्या वर्षानंतर आता का बॉलिवूडवर आरोप करत आहे, त्यावर तिने उत्तर दिलं की, बॉलिवूडच्या गटबाजीला कंटाळून आपण बॉलिवूडमधून बाहेर निघत हॉलिवूड गाठलं. आज आपलं एक वेगळं प्रस्थ बनवलं. त्यामुळे मी त्यावर बोलण्यास सक्षम आहे. जेव्हा मी पॉडकास्टमध्ये होती तेव्हा मी माझ्या प्रवासाविषयी सांगत होते. हा प्रवास माझ्या वयाच्या 10 ,15,22, 30, 40 वर्षाचा होता. पंरतु आता मला वाटतं की, जीवनाच्या त्या उंबरठ्यावर आहे, जेथून मी मागील दिवसाविषयी बोलू शकते.
अधिक वाचा : मुलांनो! मामाच्या गावाला जाण्याचा प्लान करा Ready
याबरोबर ती बोलताना म्हणाली की, मी ते सर्व विसरली आहे आणि जीवनात पुढे गेली आहे. मला वाटतं की, मी अशा जीवनाच्या वळणावर आली आहे, जेथे मी स्थिरावली आहे, जेथून मी त्याविषयी बोलू शकते. ज्या गोष्टींमुळे माझ्या नात्यांवर परिणाम झाला. परंतु आता मी लोकांना माफ केलं आहे आणि आयुष्यात पुढे गेली आहे. मी ते शांतपणे हाताळले आहे. मला असे वाटते की त्यामुळेच आता याबद्दल उघडपणे बोलणे माझ्यासाठी सोपे झाले आहे.
प्रियंका डेक्स शेफर्डच्या पॉडकास्ट या आर्मचेअर एक्सपर्ट शोमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीविषयी म्हणाली होती की, मला इंडस्ट्रीमध्ये एका बाजुला सारलं जातं होतं. लोक मला काम देत नव्हते. लोकांविषयी तक्रारी होत्या. परंतु मी असे खेळ खेळता येत नाही. यामुळे मी अशा राजकारणाला कंटाळली होती.
अधिक वाचा : Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...;
मला यातून सुटका करायची होती. या मुझ्यिक व्हिडिओने मला सीमा ओलांडण्याची संधी दिली. चित्रपट मिळवण्यासाठी कोणत्या एका गटाला किंवा व्यक्तीला मस्का लावावा लागेल. ते चित्रपट करण्याची मला अजिबात इच्छा राहिली नाही. मी बॉलिवूडमध्ये खूप काम केलं आता हॉलिवूडमध्ये काम करण्याची गरज आहे.
दरम्यान,बॉलिवूडची पोलखोल केल्यानंतर प्रियंका सध्या भारतात आहे. आपली मुलगी मालती सोबत ती भारतात आली आहे. नीता अंबानीच्या कार्यक्रमात प्रियंका आपला पती नीकसोबत आली होती. प्रियंका सध्या सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही वेबसीरिज 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होईल.