Most Admired Women 2021 : प्रियांका चोप्रा Most Admired Women 2021च्या यादीत 10 व्या स्थानावर, अँजेलिना जोलीने पटकावले दुसरे स्थान

बी टाऊन
Updated Dec 16, 2021 | 21:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Most Admired Women 2021 : प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) ने 'Most Admired Women 2021' च्या टॉप-10 यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत अँजेलिना जोली(Angelina Jolie), स्कारलेट जॉन्सन, (Scarlett Johansson)एमा वॉटसन (Emma Watson) आणि टेलर स्विफ्ट (Taylor Swift) यांचीही नावे आहेत.

 Priyanka Chopra ranks 10th in Most Admired Women 2021 list, Angelina Jolie ranks second
प्रियांका चोप्रा Most Admired Women 2021च्या यादीत 10व्या स्थानावर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रियांका चोप्रा Most Admired Women 2021च्या यादीत 10 व्या स्थानावर
  • गेल्या वर्षी प्रियांका चोप्रा 15 व्या स्थानावर होती
  • मिशेल ओबामा Most Admired Women 2021च्या यादीत अव्वल स्थानी

Most Admired Women 2021 : हॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या बॉलिवूडच्या 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या अभिनेत्रीचे नाव 'Most Admired Women 2021' च्या यादीत 10 व्या स्थानावर आहे. प्रियांका चोप्रा गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 15 व्या क्रमांकावर होती. मात्र, यावर्षी ती थेट टॉप 10मध्ये आहे. यादीत प्रियांका व्यतिरिक्त अँजेलिना जोली (Angelina Jolie), स्कारलेट जॉन्सन (Scarlett Johansson), एमा वॉटसन (Emma Watson) आणि टेलर स्विफ्ट(Taylor Swift) चेही नाव आहे.


मिशेल ओबामा अव्वल स्थानी

Most Admired Women 2021च्या यादीत मिशेल ओबामा  ( Michelle Obama) अव्वल स्थानी आहेत. तर दुसरीकडे YouGov च्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणावर आधारित या यादीत पुरुषांच्या श्रेणीत बराक ओबामा ( Barack Obama ) पहिल्या क्रमांकावर आहेत. YouGovनुसार, 38 देशांतील 42,000 लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. तर देसी गर्ल प्रियांका चोप्राने या यादीत 10 वे स्थान मिळवले आहे. सध्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या नवीन शो 'सिटाडेल' (Citadel)च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, 
तसेच तिचा ''The Matrix Resurrections' हा सिनेमाही लवकरच रिलीज होणार आहे. 
 


अँजेलिना जोली दुसऱ्या क्रमांकावर, प्रियांकाला टॉप 10 मध्ये

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर ब्रिटनची राणी एलिझाबेथ-II Most Admired Women 2021च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 
प्रियांका चोप्रा या यादीत 10 व्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या मलाला युसूफझाई 9व्या स्थानावर आहे. महत्त्वाचं म्हणजे  प्रियांका चोप्रा आणि मलाला या दोघींनीही टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये मलाला 14व्या तर प्रियांका 15व्या क्रमांकावर होती.

worlds-most-admired-2021-l

मिस वर्ल्ड, बॉलिवूड आणि आता हॉलिवूड

प्रियांका चोप्राने 2000 साली वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताची मान उंचावली होती. यानंतर 2003 मध्ये तिने सनी देओलसोबत 'द हीरो' आणि अक्षय कुमार-लारा दत्तासोबत 'अंदाज' या सिनेमांमध्ये काम केले. त्यानंतर प्रियांकाने एकाहून एक हीट सिनेमा दिले. 'बाजीराव मस्तानी', '7 खून माफ', 'फॅशन', 'बर्फी' आणि 'मेरी कॉम' सारख्या  फिल्म्समुळे  प्रियांका बॉलिवूडच्या टॉप नायिकांमध्ये गणली जाऊ लागली. यानंतर अभिनेत्रीने हॉलिवूडचे तिकीट काढले. 'क्वांटिको' सारख्या लोकप्रिय शोमुळे प्रियांका कायमच चर्चेत राहिली. मग कधी एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये रेड कार्पेटवर असो, किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये असो प्रियांकाची सतत चर्चा होऊ लागली. आणि आता तर Most Admired Women 2021 च्या यादीत प्रियांकाने 15 क्रमांकावरून थेट 10 व्या स्थानावर उडी घेतली आहे. 

2021 च्या  World's Most Admired Women 2021 ची यादी


1. मिशेल ओबामा
2. अँजेलिना जोली
3. क्‍वीन एलिजाबेथ II
4. ओप्रा विन्‍फ्रे
5. स्‍कारलेट जॉनसन
6. एमा वॉटसन
7. टेलर स्‍व‍िफ्ट
8. एंजेला मार्केल
9. मलाला युसुफजई
10. प्रियांका चोप्रा
11. कमला हॅरिस
12. हिलेरी क्‍ल‍िंटन
13. ऐश्‍वर्या राय बच्‍चन
14. सुधा मूर्ती
15. ग्रेटा थनबर्ग
16. मेलनिया ट्रम्‍प
17. लिसा
18. ल्‍यू याइफे
19. यांग मी
20. जेसिंडा आर्डर्न


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी