निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO

बी टाऊन
Updated Sep 17, 2019 | 12:27 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने आपला पती निकस जोनास याला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंका चोपडाने निकला शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Priyanka Chopra wishes Nick Jonas birthday
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री प्रियंका चोपडाने पती निक जोनासला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रियंकाने शेअर केला खास व्हिडिओ
  • व्हिडिओ पाहून निक जोनासनेही केली कमेंट

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. प्रियंका-निक या दोघांचे फोटोज आणि व्हिडिओजमधूनही दोघांचं प्रेम समोर आलं आहे. निक जोनासचा वाढदिवस असल्याने प्रियंकाने त्याला खास व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंकाच्या वाढदिवसाला निकने मियामी येथे खास केकसह तिला सरप्राईज दिलं होतं. तर प्रियंकाने सोशल मीडियात निकसाठी एक खास व्हिडिओ शेअर केलाय.

प्रियंकाने निकसाठी शेअर केलेल्या व्हिडिओत दोघांच्या आयुष्यातील काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की निक आपल्या चाहत्यांच्या गर्दीतून निघताना दिसत आहे. प्रियंका आणि निक यांचा हा रोमॅन्टिक व्हिडिओ दोघांच्याही चाहत्यांना खूपच आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने लिहिलं, तु माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येकक्षण खूपच खास आहे. तु जगातील प्रत्येक आनंदीक्षणासाठी पात्र आहेस. तू माझा झाल्यास त्याबद्दल आभार, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय लव्ह यू. प्रियंकाने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून निक जोनास याने सुद्धा त्यावर कमेंट केली आहे. निक जोनासने कमेंट करताना लव्हचं इमोजी पोस्ट केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

निक आणि प्रियंका यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती आणि काही महिन्यांतच या दोघांनी एकमेकांचं नात सर्वांसमोर शेअर करत ऑफिशिअल केलं. निक आणि प्रियंका या दोघांनी डिसेंबर २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन धर्म पद्धतीने विवाह केला. या विवाह सोहळ्यात निक जोनासचा संपूर्ण परिवार पारंपारिक वेशात पहायला मिळाला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s in the air..

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

वर्क फ्रंटचं बोलायचं झालं तर लवकरच प्रियंका चोपडाचा 'द स्काय इज पिंक' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनंतर प्रियंका चोपडा बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात प्रियंका चोपडासोबत फरहान अख्तर, जायरा वसिम आणि रोहित सराफ दिसणार आहेत. द स्काय इज पिंक हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी