Sushmita Sen : प्रियांका चोप्रा-शिल्पा शेट्टीचे सुष्मिता सेनला समर्थन; सोशल मीडियावर पोस्ट करत दर्शवले समर्थन

बी टाऊन
Updated Jul 18, 2022 | 15:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sushmita Sen : सुष्मिता सेनने स्वत:ला 'गोल्ड डिगर' म्हटल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिताने चांगलेच सुनावले आहे. दुसरीकडे, बॉलिवूड दिवा प्रियांका चोप्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी सुष्मिताला पाठिंबा देत यावर भाष्य केले. त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊया.

Priyanka Chopra-Shilpa Shetty support to Sushmita Sen for calling her gold digger
शिल्पा शेट्टी-प्रियांका चोप्राचा सुष्मिताला सपोर्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुष्मिता सेनच्या समर्थनार्थ प्रियांका चोप्रा आणि शिल्पा शेट्टी सरसावल्या.
  • ललित मोदीला डेट केल्यामुळे ट्रोल होत असलेल्या सुष्मिताने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.
  • सुष्मिताच्या समर्थनार्थ बॉलिवूड कलाकारांच्या सोशल मीडियावर पोस्ट

Sushmita Sen : सुष्मिता सेनने स्वत:ला 'गोल्ड डिगर' म्हटल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिताने चांगलेच सुनावले आहे. दुसरीकडे, बॉलिवूड दिवा प्रियांका चोप्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी सुष्मिताला पाठिंबा देत  यावर भाष्य केले. त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊया. 
 
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती बिझनेसमन ललित मोदीला डेट करत आहे. नुकतेच ललित मोदीने सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आणि ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड केले. तेव्हापासून या दोघांबद्दल सोशल मीडियावर मीम्स तयार होत आहेत. मात्र, सुष्मितावर केवळ मीम्स नाही तयार झाल्या तर युजर्सनी सुष्मिताला 'गोल्ड डिगर' म्हटले आहे. 


सुष्मिता सेनची पोस्ट

सुष्मिताने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर पोस्ट केले आणि तिला 'गोल्ड डिगर' म्हणत असलेल्या सर्वांना उत्तर दिले. तिने पोस्टमध्ये लिहिले की "लोक किती दयनीय आणि दुःखी आहेत हे पाहून वाईट वाटते. तिला माहित नसलेले लोक तिच्याबद्दल बोलत आहेत.माझ्या आयुष्याबद्दल आणि चारित्र्याबद्दलचे विचार व्यक्त करत आहेत. तिने असेही लिहिले की मला सोन्यापेक्षा जास्त हिरे आवडतात.हिऱ्याला पैलू पाडण्यावर माझा भर जास्त आहे." सुष्मिताच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही तिला पाठिंबा दिला.

अधिक वाचा : Zodiac: जाणून घ्या राशीनुसार तुमचा बेस्ट लाईफ पार्टनर


प्रियांका चोप्रा आणि शिल्पा शेट्टीने केले सुष्मिताचे समर्थन

प्रियांका चोप्राने सुष्मिता सेनच्या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. प्रियांकाने लिहिले, 'Tell her Queen' आणि त्यासोबत एक फायर इमोजी बनवली. तर तिथे शिल्पा शेट्टीने कमेंट करत 'लव्ह यू माय स्टार सुश' असे लिहिले. दुसरीकडे नेहा धुपियाने फक्त सुश लिहून हार्ट अँड फायर इमोजी बनवली. याशिवाय रणवीर सिंग, सुनील शेट्टी, अथिया शेट्टी, नेहा धुपिया, अपारशक्ती खुराना आणि सोफी चौधरी यांनीही कमेंट केली आहे आणि सुष्मिताला सपोर्ट केलेला आहे. 

अधिक वाचा : हार्दिक पंड्याच्या नावे नवं रेकॉर्ड

ललित मोदीचे सुष्मिता सेनसोबतचे नाते समोर आल्यानंतर ती सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. याआधी दोघांनी लग्न केल्याचे बोलले जात होते, मात्र नंतर ललित मोदी यांनी अद्याप लग्न केले नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर सुष्मितानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत आपण विवाहित नसल्याची पुष्टी केली.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी