पार्टीत प्रियंकाने या व्यक्तीसोबत दिली हॉट पोझ

बी टाऊन
Updated May 19, 2019 | 15:43 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९मध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आपला जलवा दाखवत आहेत. दीपिका पदुकोण पासून ते प्रियंका चोपडा पर्यंत सर्वच वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत.

priyanka chopra
प्रियंका चोपडा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९मध्ये प्रियंका चोपडाने शानदार अंदाजामध्ये एंट्री घेतली. इतकंच नव्हे तर ही अभिनेत्री आपला पती निक जोनाससोबत जलवा दाखवताना दिसली. हे स्टार कपल आपल्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे चांगलेच चर्चेच आहे. कान्समध्ये रेड कार्पेटपासून ते पार्टीपर्यंत प्रियंका आपल्या पतीसोबत दिसली. यातच कान्समधील तिचे काही फोटोज समोर आले आहेत. 

हे फोटो पाहून तिचा पती निक जोनासला चांगलाच झटका बसू शकतो. समोर आलेल्या या फोटोंमध्ये प्रियंकासोबत एक व्यक्ती आहे. या फोटोत दोघेही एकमेकांच्या जवळ दिसत आहेत. प्रियंकाचे हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती आहे तरी कोण? वीरल भयानीने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना सांगितेले आहे की ही व्यक्ती कोण आहे. 

त्यांनी लिहिलेय की की व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून प्रियंकाचे फेव्हरिट स्टायलिस्ट संजय कुमार आहे. संजय कुमार प्रियंकाला ग्लॅमरस आणि हॉट लूक देतात. 

हा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चाहते सातत्याने कमेंट करत आहेत की ही व्यक्ती कोण आहे. प्रियंकाने या फोटोमध्ये मेटॅलिक ब्लॅक हाय लिस्ट कलरचा गाऊन घातला आहे. या गाऊनसोबत प्रियंकाने कॉपर शेडमध्ये मेकअप केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच निक जोनास ब्राऊन कलरच्या जॅकेट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसत आहेत. दोघेही या आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहेत. 

कान्समध्ये प्रियंका आपला लूक आणि आऊटफिटमुळे चांगलीच चर्चेत आहे. पहिल्या दिवशी तिने ब्लॅक अँड रोज गोल्ड रंगाचा ड्रेस घालत डेब्यू केले होते. तिच्या दोनही रेड कार्पेट लूकला चांगली पसंती मिळाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पार्टीत प्रियंकाने या व्यक्तीसोबत दिली हॉट पोझ Description: कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९मध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आपला जलवा दाखवत आहेत. दीपिका पदुकोण पासून ते प्रियंका चोपडा पर्यंत सर्वच वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles