प्रियांका चोप्राला युक्रेनच्या निर्वासितांची चिंता

Priyanka Chopra urges world leaders to help refugees amid Ukraine crisis : बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजविणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिला युक्रेनच्या निर्वासितांची चिंता वाटत आहे.

Priyanka Chopra urges world leaders to help refugees amid Ukraine crisis
प्रियांका चोप्राला युक्रेनच्या निर्वासितांची चिंता 
थोडं पण कामाचं
  • प्रियांका चोप्राला युक्रेनच्या निर्वासितांची चिंता
  • लाखो निर्वासित सध्या युरोपमधील युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये
  • निर्वासितांचा प्रश्न सोडविण्यासाठी जगभरातील देशांनी परस्परांना सहकार्य करावे - प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra urges world leaders to help refugees amid Ukraine crisis : कॅलिफोर्निया : बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजविणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिला युक्रेनच्या निर्वासितांची चिंता वाटत आहे. स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ अपलोड करून प्रियांकाने जगभरातीन नेत्यांना युक्रेनच्या निर्वासितांचा प्रश्न हाताळण्याचे आवाहन केले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून हा प्रश्न हाताळावा आणि जे युक्रेनच्या निर्वासितांसाठी काम करत आहेत त्यांना सहकार्य करावे; अशा स्वरुपाचे आवाहन प्रियांकाने केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

युक्रेनमधून बाहेर पडलेले लाखो निर्वासित सध्या युरोपमधील युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये आहेत. या निर्वासितांचे पुनर्वसन करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. हे काम करण्याकरिता विविध देशांना सहकार्य करण्यासाठी निवडक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. या संस्था आणि विविध देश यांनी परस्पर सहकार्यातून एक योजना आखली, निधी कसा वापरावा याचे नियोजन केले आणि त्या योजनेची अंमलबजावणी केली तर लाखो निर्वासितांचा प्रश्न सोडविणे शक्य होईल; अशी आशा प्रियांकाला वाटत आहे.

युक्रेनमधील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत रशियाने त्यांच्या रक्षणासाठी सैन्य पाठवत असल्याचे जाहीर केले. यानंतर रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ पासून मान्यता दिलेल्या देशांच्या तसेच रशियाच्या सुरक्षेसाठी आणि युक्रेनच्या संहारक अस्त्रांचा नायनाट करण्यासाठी विशेष लष्करी मोहीम सुरू केली. रशियाने मोहिमेला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून लाखो नागरिकांनी पलायन केले आहे. हा निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

अमेरिका आणि अमेरिकेचे समर्थक असलेल्या अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर तसेच रशियातील निवडक नागरिकांनी निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे आर्थिक कोंडी होईल, रशियाच्या चलनाचे अवमूल्यन होईल आणि वाढत्या आर्थिक घसरणीमुळे रशिया युक्रेन विरुद्धची मोहीम थांबवेल असा दावा अमेरिकेने केला. पण दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी रशियाची युक्रेनविरुद्धची कारवाई थांबलेली नाही. रशियाची कारवाई सुरू असल्यामुळे युक्रेन निर्वासितांचा प्रश्न आणखी गंभीर होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी