Priyanka Chopra New Look: प्रियांका चोप्राचा न्यू लूक, फोटो पाहून चाहते झाले थक्क

बी टाऊन
Updated Jan 14, 2022 | 15:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Priyanka Chopra New Look : प्रियांका चोप्राने नुकतेच केले आहे. हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रियांकाचा लूक आणि स्टाईल पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Priyanka Chopra's new look, fans were surprised to see the photo
प्रियांकाचा न्यू सिझलिंग लूक, चाहते थक्क  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • प्रियांकाचा न्यू सिझलिंग लूक, चाहते थक्क
  • प्रियांका चोप्राचे ग्लॅमरस फोटो
  • प्रियांका चोप्राच्या फोटोंना 6 लाखांहून अधिक लाईक्स

Priyanka Chopra New Look : अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव  (Priyanka Chopra) बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सगळीकडेच आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. प्रियांकाचा लूक आणि स्टाइल तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी बनवते, ज्यामुळे लाखो लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Priyanka Chopra New Look: प्रियंका चोपड़ा ने नए लुक में दिखाया सिजलिंग अवतार, फोटोज देख फैंस ने थामा दिल

प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल माहिती देत ​​असते. प्रियांकाने नुकतेच एका नवीन लूकमध्ये (Priyana Chopra New Look) फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये प्रियांका ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. तिने रेड कलरच्या गाऊनमधला एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच तिने फोटोशूटचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले आहे – व्हॅनिटी फेअर, फेब्रुवारी २०२२. यासोबतच तिने तिच्या फोटोशूटबद्दल माहिती दिली आहे. तिच्या या फोटोंना 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.


चाहत्यांसह सेलिब्रिटी प्रियांकाच्या या फोटोंवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. सोनम कपूरने कमेंट केली - सुंदर. या सौंदर्याचा अभिमान आहे. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले - कोणी इतके सुंदर कसे असू शकते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियंका अखेरची बॉलिवूड चित्रपट 'द व्हाईट टायगर'मध्ये (The White Tiger) दिसली होती. ती लवकरच झोया अख्तरच्या जी ले जरा (Jee le Zara) या चित्रपटात दिसणार आहे. सध्या प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी