Bedroom Secret रात्रभर झोपू देत नाही निक : प्रियांका

priyanka reveal bedroom secret । बॉलिवूड गर्ल प्रियांका चोप्रा हिनं एक बेडरूम सीक्रेट ओपन केलं. निक जोनास रात्रभर झोपू देत नाही असं प्रियांका म्हणाली. यामागचं कारण प्रियांकानं प्रामाणिकपणे सांगितलं.

priyanka reveal bedroom secret
रात्रभर झोपू देत नाही निक : प्रियांका 
थोडं पण कामाचं
  • रात्रभर झोपू देत नाही निक : प्रियांका
  • प्रियांकानं ओपन केलं बेडरूम सीक्रेट
  • कारण प्रियांकानं प्रामाणिकपणे सांगितलं

priyanka reveal bedroom secret । मुंबईः बॉलिवूड गर्ल प्रियांका चोप्रा हिनं एक बेडरूम सीक्रेट ओपन केलं. निक जोनास रात्रभर झोपू देत नाही असं प्रियांका म्हणाली. यामागचं कारण प्रियांकानं प्रामाणिकपणे सांगितलं.

निकला मधुमेहाचा (डायबिटिस) त्रास आहे. रात्री झोपेतही निकला त्याच्या 'शुगर लेव्हल'ची चिंता वाटते. अनेकदा या चिंतेपोटी तो स्वतः रात्री झोपत नाही आणि त्याच्यामुळे मलाही झोपता येत नाही, असं प्रियांकानं सांगितलं.

अनेकदा रात्री निकला त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासून सर्व काही सामान्य असल्याची खात्री करुन घ्यावीशी वाटते. मग तो अधूनमधून 'शुगर लेव्हल' तपासतो. यामुळे बेडरूममध्ये दिवा लागतो. दिव्याच्या प्रकाशात झोप येणं कठीण आहे. यामुळे अनेकदा प्रियांकाला पण जागं राहावं लागतं. पण पतीचा त्रास समजून घेऊन ती वाद टाळते. 

वारंवार 'शुगर लेव्हल' तपासण्याच्या सवयीमुळे निक अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागा असतो. निकच्या जागरणामुळे प्रियांका पण अनेकदा उशिरापर्यंत जागरण करते. निकवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रियांकाला लग्नाच्या आधीपासूनच निकच्या त्रासाची कल्पना होती. पण या त्रासासकट प्रियांकाने निकचा स्वीकार केला आहे. यामुळे आजही प्रियांका आणि निक एकमेकांना साथ देत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक यांनी २ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. जोधपूर येथे हिंदू पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यंदाच्या २ डिसेंबर रोजी प्रियांका आणि निकच्या लग्नाला तीन वर्ष होतील. आजही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. या प्रेमापोटी एकमेकांची काळजी घेतो. ही काळजी घेताना स्वतःला कळत नकळत होणाऱ्या त्रासांकडे दुर्लक्ष करतो, हेच प्रियांकाने मुलाखतीत निकविषयी बोलताना अप्रत्यक्षपणे सांगितले.

पतीची सेवा करणाऱ्या प्रियांकावर तिचे चाहते प्रचंड खूष आहेत. प्रियांका-निकचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होवो, अशा शुभेच्छा ते देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी