South Cinema : दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अल्लू अर्जुनची नेहमीच क्रेझ बघायला मिळते. पुष्पा सिनेमामुळे त्याच्या लोकप्रियतेत अजून वाढ झाली आहे. सध्या अल्लू अर्जुन पुष्पा 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामुळे त्याची गणती सुपरस्टारमध्ये झाली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. लोकांना या सिनेमातील डायलॉग सुध्दा पाठ आहेत. यामुळेच आता चाहते दुसऱ्या भागाची वाट बघत आहेत.
पुष्पा 2 चे शूटिंग सुरू झाल्यापासून त्यासंबंधीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यासंबंधीत आता नवीन बातमी समोर आली आहे. रश्मिकासोबत अजून एक अभिनेत्री पुष्पा 2 सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा :प्राजूनं तोडलं मराठी अभिनेत्यांचं दिल!
रश्मिका तर या सिनेमात आहेच. याशिवाय या सिनेमात साउथची अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. साई पल्लवी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याच आठवड्यात साई पल्लवीचे या सिनेमातील शूटिंग पूर्ण होणार आहे.
निर्मात्यांनी याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. परंतु पुष्पा २ मध्ये साई पल्लवी असल्याने तिच्या चाहते आनंदित झाले आहेत. अल्लू अर्जुनबरोबर साईला पाहणं तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच सुखावणारी गोष्ट आहे. याआधीही पुष्पा २ सिनेमासाठी सामंथा रुथ प्रभू हिला विचारण्यात आले होते. परंतु तिनं काम करायला नकार दिला.
अधिक वाचा :मृत्यूच्या दाढेतून परतलेले सेलिब्रेटी
दरम्यान अल्लू आणि रश्मिका यांच्यामुळे पुष्पा २ सिनेमा खूपच चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम सुकुमार यांच्याकडे आहे. सिनेमाच्या दुसऱ्या भागात कोणतीही उणीव ठेवायची नाही असा त्यांनी ठरवले आहे. पुष्पा सिनेमाला मिळालेल्या यशानंतर पुष्पा २ ला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.