pyar ka panchnama 3: प्यार का पंचनामा-३ येणार, 'या' अभिनेत्याने दिली बातमी! 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Sep 03, 2020 | 16:22 IST

Pyaar ka Punchnama 3: कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा आणि सनी सिंग यांचे हिट सिनेमे प्यार का पंचनामा-2 आणि सोनू के टीटू की स्वीटी याचे सीक्वेल येणार आहेत.

Sonu_Ke_Titu_Ki_Sweety
प्यार का पंचनामा ३  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • प्यार का पंचनामा-३ येणार, अभिनेता सनी सिंगने दिला दुजोरा 
  • प्यार का पंचनामा या सिनेमाचे दोन्ही भाग तरुणांमध्ये प्रचंड आवडीचे ठरले होते 
  • प्यार का पंचनामा आणि सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमांचे लवकरच सीक्वेल येणार आहेत.

मुंबईः अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सनी सिंह (Sunny Singh) यांच्या चाहत्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे. स्वत: अभिनेता सनी सिंह याने असं सांगितलं आहे की, 'सोनू के टीटू की स्वीटी' (Sonu ke titu ki sweety) या सिनेमाचा सीक्वेल येणार आहे. ज्या सिनेमाचं नाव नक्कीच 'प्यार का पंचनामा 3' (pyar ka panchnama 3) असं असणार आहे. गेले अनेक दिवस याविषयी बातम्या समोर येत होत्या. मात्र आता स्वत: सनी सिंह याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सनीने मुंबई मिररशी बोलाताना सांगितलं की, 'लव सरांच्या मनात नक्कीच  काही तरी चालू आहे. पण नेमकं कधीपर्यंत हे ठरु शकलेलं नाही. मात्र सोनू के टिटू की स्वीटी या सिनेमाचा सीक्वेल नक्की येणार आहे. जो 'प्यार का पंचनामा' याचा तिसरा भाग असेल.' दिग्दर्शक लव रंजन याने प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा  २ आणि सोनू की टिटू की स्वीटी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचे तीनही सिनेमे हीट ठरले आहेत. त्यामुळे या पुढच्या सीक्वेलमध्ये नेमकं काय असणार? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या सनी सिंह याने कसौटी जिंदगी की, आणि शकुंतला या मालिकांमध्ये काम केलं होतं. तर अभिनेता अजय देवगण, इमरान हाश्मी आणि श्रुती हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'दिल तो बचा है जी' या चित्रपटातून सनी सिंहने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.

त्यानंतर सिनेमानंतर अभिनेता सोनू सिंहने दिग्दर्शक लव रंजन आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्यासमवेत आकाश वाणी, प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टीटू की स्वीटी यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

याबद्दल बोलताना सनी म्हणाला, 'मी योगायोगाने छोट्या पडद्यावर आलो होतो. पण लहानपणापासूनच मला फिल्म स्टार व्हायचे होते. म्हणून, मी स्वत:ला तयार केले होते. अभिनय, नृत्य आणि अगदी क्लासेस लावले. वेगवेगळ्या लोकांना भेटलो. पण जोवर मला लव सर भेटले नाही तोवर मला यश मिळू शकलं नाही. पण जेव्हा त्यांची माझी भेट झाली त्यानंतरच मला यश मिळालं. नकार हा प्रत्येक उद्योगाचा एक भाग आहे, परंतु मला विश्वास होता की, एक दिवस माझं स्वप्न नक्कीच साकार होईल. यासाठी वेळ लागेल, कारण तुमच्यात असणारी प्रतिभा कधीही लपून राहत नाही.'

दरम्यान, सोनू सिंह हा आता आपल्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत असून फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो पुढे असंही म्हणाला की, 'सध्या गोष्टी पाइपलाइनमध्ये आहेत, पण कोविड -१९ नंतर गोष्टी कशा असतील त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. लवकरच याबाबत स्पष्टता येईल अशी मला आशा आहे.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी