R. Madhavan's son won five gold medals : बॅालिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आर.माधवनच्या मुलाने पुन्हा एकदा गौरवशाली काम केले आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स 2022 मध्य प्रदेश येथे पाच सुवर्ण पदक तर दोन रौप्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत माधवनच्या मुलाने महाराष्ट्राकडून सात पदके पटकवली आहेत. तसेच माधवनने महाराष्ट्र संघाचे आभार मानत म्हणाला, प्रदीप सरांचे अथक प्रयत्न आणि मध्य प्रदेश सरकार यांचे आभार. खूप आनंदी आणि अभिमान आहे.
या कामगिरीबद्दल कळल्यानंतर आर माधवनच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील सर्व कलाकारांसह वेदांतला शुभेच्छा दिल्या. वेदांत गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सर्वात आश्वासक जलतरणपटूंपैकी एक आहे आणि त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत.
कोपेनहेगन येथे झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत स्थानिक खेळाडू अॅले्कजेंडर एल ब्योर्नला हरवून पुरूषांच्या 800 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. आधीही या स्पर्धेत 1500 मीटर फ्रीस्टाईल मध्ये रौप्य पदक मिळवले आहे. 2021च्या लातविय ओपन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. गेल्या वर्षी जूनियर नॅशनल एक्वेटिक चॅंपियनशिप मध्ये सात पदकं पटकवली होती.