लीक झालेल्या नग्न क्लिपबद्दल बोलली राधिका आपटे, सांगितले की तिचा ड्रायव्हर आणि वॉचमनने तिला ओळखले

'अंदाधुन' या चित्रपटातली अभिनेत्री राधिका आपटे हीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची न्यूड क्लिप जेव्हा लीक झाली तेव्हाचा आपला अनुभव सांगितला. यात तिने म्हटले की तिच्या ड्रायव्हरने आणि वॉचमनने तिला ओळखले.

Radhika Apte
लीक झालेल्या नग्न क्लिपबद्दल बोलली राधिका आपटे, सांगितले की तिचा ड्रायव्हर आणि वॉचमनने तिला ओळखले  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • लीना यादव यांच्या पार्च्ड चित्रपटात न्यूड होण्याचा सांगितला अनुभव
  • लीक झालेल्या न्यूड क्लिपबद्दलचा अनुभवही केला शेअर
  • मिसेस अंडरकव्हर आणि ओके कंप्यूटरमध्ये दिसणार राधिका

नवी दिल्ली: बॉलिवुड अभिनेत्री (Bollywood actress) राधिका आपटेने (Radhika Apte) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत (interview) लीना यादव (Leena Yadav) यांच्या पार्च्ड (Parched) या चित्रपटासाठी (film) नग्न दृश्ये (nude scenes) देण्याबद्दलचा आपला अनुभव (experience) शेअर (share) केला. एका मासिकाला (magazine) दिलेल्या या मुलाखतीत तिने तिची नग्न क्लिप (nude clip) जेव्हा लीक (leak) झाली होती त्यावेळी तिने घालवलेला तणावपूर्ण काळही (tough period) सांगितला. ग्राझिया (Grazia) या मासिकाशी बोलताना तिने सांगितले की क्लीन शेव्हन (Clean Shaven) या चित्रपटासाठी चित्रीकरण (shooting) करत असताना तिची ही नग्न क्लिप लीक झाली होती. यानंतर 4 दिवस तिला घराबाहेर पाऊल ठेवणे शक्य झाले नाही असेही तिने सांगितले कारण तिचा ड्रायव्हर (driver) आणि वॉचमन (watchman) तिला ओळखतील याची तिला भीती (fear) होती.

माझी न्यूड क्लिप लीक झाल्यानंतर झाले ट्रोलिंग – राधिका

यावेळी राधिका आपटे म्हणाली, "जेव्हा माझी नग्न क्लिप लीक झाली तेव्हा मी क्लीन शेव्हन या चित्रपटासाठी चित्रीकरण करत होते. क्लिप लीक झाल्यानंतर मला प्रचंड ट्रोल केले गेले आणि माझ्यावर याचा परिणाम झाला. मी चार दिवस घराबाहेर पडू शकले नाही. याचे कारण माध्यमे माझ्याबद्दल काय बोलत आहेत हे नव्हते, तर माझा ड्रायव्हर, वॉचमन आणि माझ्या स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने मला त्या फोटोंमध्ये ओळखले होते. मला नाही वाटत अशावेळी कुणी काही करू शकते, किंवा करावे. याकडे फक्त दुर्लक्ष करावे. अन्यथा फक्त वेळ वाया जातो. जेव्हा मी पार्च्ड या चित्रपटासाठी नग्न झाले तेव्हा माझ्या लक्षात आले की आता माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही."

कॅमेऱ्यासमोर नग्न होणे थोडे त्रासदायक

राधिकाने कॅमेऱ्यासमोर नग्न होण्याचा आपला अनुभवही शेअर केला आणि म्हटले, "पडद्यावर नग्न होणे हे काहीसे त्रासदायक होते. पण आता मी हे सर्व सहन करू शकते. मला माझ्या शरीराच्या आकाराचा अभिमान आहे. अर्थात, तो चित्रपट अनेक ठिकाणी पोहोचला आणि त्यामुळे मला दादही मिळाली आणि कामही." तिने सांगितले की ती अशा भूमिकेच्या शोधात होती जिथे तिला पार्च्ड या चित्रपटातल्या भूमिकेसारखी तिची लैंगिकता आणि तिचे शरीर तिला समजून घेता येईल. बॉलिवुडमध्ये सतत अभिनेत्याला त्याने त्याच्या शरीरासोबत काय करायचे हे सांगितले जाते असेही तिने म्हटले. तिची याबाबतची भूमिका अशीच होती की ती तिच्या शरीराला किंवा चेहऱ्याला कधीही काहीही करणार नाही.

लवकरच या वेबसीरीजमध्ये दिसणार राधिका आपटे

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर राधिका लवकरच 'मिसेस अंडरकव्हर'मध्ये अनुश्री मेहता यांच्या दिग्दर्शनात दिसणार आहे. यात तिच्यासोबत सुमित व्यास असेल. तसेच ओके कंप्यूटर या विनोदी विज्ञानाधारित वेबसीरीजमध्येही ती जॅकी श्रॉफ, विजय शर्मा आणि रसिका दुगल यांच्यासोबत दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी