राधिकाने सांगितला 'मिसेस अंडरकव्हर'च्या शूटिंगचा अनुभव

प्रसिद्ध अभिनेत्री आणि ओटीटी क्वीन राधिका आपटे 'मिसेस अंडरकव्हर' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी काही दिवस ती कोलकातामध्ये होती.

Radhika Apte share her 'Mrs Undercover' shooting experiecne
राधिका आपटे 

थोडं पण कामाचं

  • राधिकाने सांगितला 'मिसेस अंडरकव्हर'च्या शूटिंगचा अनुभव
  • कोरोना संकटाच्या काळात ४५ दिवस कोलकातामध्ये केलेल्या शूटिंगचा अनोखा अनुभव
  • दररोज फक्त हॉटेलपासून लोकेशनपर्यंतचाच प्रवास

मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री आणि ओटीटी क्वीन राधिका आपटे 'मिसेस अंडरकव्हर' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी काही दिवस ती कोलकातामध्ये होती. ऐन कोरोना संकटाच्या काळात ४५ दिवस कोलकातामध्ये केलेल्या शूटिंगचा अनोखा अनुभव असल्याचे राधिका म्हणाली. Radhika Apte share her 'Mrs Undercover' shooting experiecne

'शूटिंगच्या काळात आमची वारंवार कोरोना चाचणी होत होती. सर्वजण आपापली भरपूर काळजी घेत होते. कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन केले जात होते. प्रत्येक सरकारी सूचना पाळली जाईल याची खबरदारी घेतली जात होती. दररोज फक्त हॉटेलपासून लोकेशनपर्यंतचाच प्रवास करत होतो. शूटिंगशी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. अन्यत्र कुठेही गेलो नव्हतो'; असे राधिकाने सांगितले. एरवी शूटिंगचे सलग काही दिवसांचे मोठे शेड्युल्ड लागले तर त्यात वेळ काढून जवळच्या भागात छोटेखानी सहल किंवा पार्टीसारखे कार्यक्रम होतात. पण यावेळी कोरोनामुळे असे कोणतेही अवांतर आयोजन केले नव्हते, असे राधिका म्हणाली.

'मिसेस अंडरकव्हर' हा सिनेमा कोलकातामध्ये हेरगिरी करणाऱ्या गृहिणीशी संबंधित आहे. होळीच्या दिवशी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले होते. यात एक लाल साडी नेसलेली महिला कंबरेला रिव्हॉल्व्हर खोचून ठेवत असल्याचे चित्र होते आणि शेजारी 'मिसेस अंडरकव्हर' हे शब्द होते. हा सिनेमा म्हणजे स्पाय एंटरटेनर आहे असे राधिका म्हणाली होती. अनुश्री मेहता या सिनेमाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत.

याआधी राधिकाने भूमिका साकारलेल्या 'ओके कॉम्प्युटर' वेबसीरिजचे प्रचंड कौतुक झाले. यामुळे राधिकाकडून असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनापासून अभिनय करत असल्याचे राधिका म्हणाली. लवकरच आणखी काही सिनेमांमध्येही दिसणार असल्याचे राधिकाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी