Armaan Jain Anissa Malhotra Jain Pregnant Godh Bharai Video : रणबीर आणि आलियाने 2022 च्या जूनमध्ये आपली प्रेग्नंसी जगजाहीर केली आणि नोव्हेंबर 2022 ला कपूर खानदानात राहा कपूरचा जन्म झाला जी, या फॅमिलीची सर्वात छोटी सदस्य आहे. लवकरच राहाला छोटा भाऊ किंवा बहिण भेटणार आहे. यावेळी ही कोणत्याही प्रकारची अफवा नसून सत्य आहे.
अधिक वाचा : Sid and Kiara : सिड-कियाराच्या रिसेप्शनचा शेअर केलेला एक अनसीन व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुलीला एक भावंड भेटणार आहे. खरतरं, रणबीर कपूरचा भाऊ,अॅक्टर अरमान जैन आणि त्याची पत्नी अनीसा मल्होत्रा प्रेग्नेंट आहेत.
कपूर खानदानात पुन्हा हलणार पाळणा
जस की, आम्ही तुम्हाला सांगितले अरमान जैन आणि त्याची पत्नी अनीसा मल्होत्रा प्रेग्नेंट आहेत आणि आताच तिचे डोहाळेजेवण पार पडले. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अरमान जैन आणि त्याची पत्नी अनीसा मल्होत्रा कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहेत. या सोहळ्यासाठी करीना कपूरसह कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.