राज कुंद्राच्या अटकेचा शिल्पाच्या हंगामा २च्या रिलीजवर कोणताही परिणाम नाही

बी टाऊन
Updated Jul 23, 2021 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

सिनेनिर्माता प्रियदर्शन पुन्हा एकदा दर्शकांना हसवण्यासाठी तयार आहे. त्यांचा सिनेमा हंगामा २ रिलीज होतोय. हा सिनेमा हंगामाचा सिक्वेल आहे. 

shilpa shetty
कुंद्राच्या अटकेचा हंगामा २च्या रिलीजवर कोणताही परिणाम नाही 
थोडं पण कामाचं
  • डिस्ने प्लस हॉटस्टारवर आजच हा सिनेमा रिलीज होतोय.
  • राज यांच्या अटकेचा हंगामा २च्या रिलीजवर कोणताही परिणाम होणार नाही. 
  • अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली

मुंबई: सिनेनिर्माता प्रियदर्शन पुन्हा एकदा दर्शकांना हसवण्यासाठी तयार आहे. त्यांचा सिनेमा हंगामा २ रिलीज होतोय. हा सिनेमा हंगामाचा सिक्वेल आहे. दरम्यान, सध्या शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा अटकेत आहे. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली. दरम्यान, या अटकेचा हंगामा २च्या रिलीजवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सिने निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. 

डिस्ने प्लस हॉटस्टारवर आजच हा सिनेमा रिलीज होतोय. दरम्यान, राज कुंद्राने याबाबत हायकोर्टात अपील केले आहे. या सिनेमाचे निर्माते रतन जैन यांनी एका पोर्टलशी बातचीत करताना सांगितले की राज यांच्या अटकेचा हंगामा २च्या रिलीजवर कोणताही परिणाम होणार नाही. 

याबाबत पुढे बोलताना रतन जैन म्हणाले, राज यांच्या अटकेच्या शिल्पाच्या सिनेमावर कोणताही परिणाम होणार नाही. शिल्पा यांच्या पतीवर हा गुन्हा दाखल आहे शिल्पावर नाही. त्यामुळे हंगामा २ वर याचा कोणताही परिणाम होईल असे वाटत नाही. आम्ही याचा परिणाम हंगामा २च्या रिलीजवर का होऊ द्यावा. ते तिच्या पतींनी केले आहे तिच्यावर गुन्हा नाही. ती सिनेमातील एक कलाकार आहे आणि तिने प्रमोशनसह सगळी कामे केली आहेत. तसेच तपास एजन्सीनेही असे म्हटले की त्यांना या प्रकरणात शिल्पाचा काही सहभाग असल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे सिनेमाच्या रिलीजवर त्याचा परिणाम का व्हावा. दरम्यान, काही केलेले नसतानाही लोक तिचे नाव या प्रकरणात घेत आहे याचे दु:ख आहे. 

मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याची अटक केली. 

या चॅटमध्ये राज कुंद्रा प्रदीप बख्शी नावाच्या व्यक्तीशी चित्रपटातील कमाईविषयी चर्चा करत असल्याचं आढळून आले आहे. या चॅटमध्ये चित्रपटातील कमाई आणि नुकसानाविषयी चर्चा केली गेली आहे. या अश्लील चित्रपटातून राज दररोज लाखो रुपये कमावत असल्याचं निदर्शनात आले आहे. 

राज यांनी केलेल्या चॅटमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. राज चॅटमध्ये म्हणाले की, मिळकतीसाठी ते या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करत आहेत. 10 ते 15 अभिनेत्रींना पेमेंट उशिरा झाल्याची चर्चाही त्यांनी आपल्या व्हॉट्स अप चॅटमध्ये केली आहे. यामुळे मुंबई पोलीस या व्हॉट्सअप चॅटशी संबंधीत इतर लोकांचीही येत्या काही दिवसात चौकशी करतील. मुंबई पोलिसांनी  सोमवारी राज कुंद्राला चौकशीसाठी बोलवलं होतं. काही तास चौकशी केल्यानंतर राजला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी देखील केली. दरम्यान राजने त्याच्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी