मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅंचने (Crime Branch)आतापर्यत राज कुंद्राच्या (Raj Kundra)विविध बॅंक खात्यांमधील (Raj Kundra Bank Accounts) ७ कोटी ३१ लाख रुपये गोठवले आहेत. ही रक्कम वेगवेगळ्या बॅंकांमधील आहे. क्राइम ब्रॅंचने यासमिन खान उर्फ रोआ खानच्या खात्यावरील ३४ लाख ९० हजार रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. याशिवाय दीपंकर उर्फ शान, गहना वशिष्ठ यांच्या तीन खात्यांमधील आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याच्या दोन बॅंक खात्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ( Crime Branch Rs 7 crore freeze from Raj Kundra's Bank Accounts, many Small production houses were producing Porn films for Raj)
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅंचने दीपंकर उर्फ शानच्या खात्यातील १ लाक २० हजार रुपये गोठवले आहेत. तर गहना वशिष्ठच्या तीन बॅंक खात्यातून जवळपास ३६ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. तनवरी हाशमीच्या दोन बॅंक खात्यातून ६ लाख रुपये आणि अरविंद नावाच्या व्यक्तीच्या बॅंक खात्यातून १ कोटी ८१ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. याशिवाय कानपूरमध्ये हर्षिता श्रीवास्तवच्या बॅंक खात्यातून २ कोटी ३२ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. त्यासोबत नर्बदा श्रीवास्तवच्या बॅंक खात्यातून ५ लाख ५९ हजार रुपये गोठवले गेले आहेत. याव्यतिरिक्त फ्लिझ मूव्हिज, ओपीसी प्रा. लि,च्या भोपाळ बॅंक खात्यातून ३० लाख ८७ हजार रुपये आणि मुदतठेवीत ठेवलेले १ कोटी २८ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म्स बनवण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅंचने अटक केली आहे. अटकेनंतर राज कुंद्राला न्यायालयाने २३ जुलैपर्यत पोलिस कोठडीत पाठवले आहे. आज राज कुंद्राची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी झाली आहे. त्याचे हॉस्पिटलबाहेरील फोटो समोर आले आहेत. बॉलीवूड स्टार शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्या अटकेनंतर मुंबईतील अनेक लहानमोठे पॉर्न रॅकेट्स समोर येत आहेत. सूत्रांनुसार मुंबई पोलिसांना अशा एका नेटवर्कची माहिती मिळाली आहे ज्यात शहरातील अनेक छोटे प्रॉक्शन हाऊसचा समावेश आहे. हे प्रॉडक्शन हाऊस राज कुंद्राच्या अॅपसाठी काम करायचे. या अॅपला आता प्लेस्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. पोलिसांना अनेक व्हिडिओ मिळाले आहेत.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात तपास सुरू केला होता. सखोल तपासाअंती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राने इंग्लंडमधील एका कंपनीला आपले हॉटस्पॉट हे अॅप विकले आहे. भारतात तपास यंत्रणांना जाळ्यात न सापडण्यासाठी राजने हे केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडमधील त्या कंपनीचा मालक राज कुंद्रा यांचा साला आहे. राज कुंद्रा हॉटस्पॉट अॅप बंद करून एक नवे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या तयारीत होता.