पीडिताची ह्रदयद्रावक कहाणी, जबरदस्तीने करवण्यात आला सेक्स, गहना वशिष्ठने धमकावत सुरू ठेवले शूटिंग

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jul 29, 2021 | 22:15 IST

राज कुंद्रासह (Raj Kundra) या दोघींवर पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोप आहेत. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार दोन पीडित तरुणींचा आरोप आहे की त्यांना जबरदस्तीने अश्लील व्हिडिओची शूटिंग करण्यास भाग पाडण्यात आले.

Raj Kundra & Gehana Vasisth
राज कुंद्रा आणि गेहना वशिष्ठ 
थोडं पण कामाचं
  • राज कुंद्रा पॉर्नोग्राफीक प्रकरणातील दोन पीडितींची कहाणी
  • पीडित तरुणीची कास्टिंग डायरेक्टर नरेशने घडवून आणली गेहना वशिष्ठशी भेट
  • धमकावत जबरदस्तीने गेहनाने घडवून आणला सेक्स आणि केले शूटिंग

मुंबई: राज कुंद्राला अटक झालेल्या पॉर्नोग्राफिक प्रकरणात (Pornography Case) आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth)आणि रोवा खान (Rowa Khan)यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. राज कुंद्रासह (Raj Kundra) या दोघींवर पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोप आहेत. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार दोन पीडित तरुणींनी आरोप केला आहे की त्यांना जबरदस्तीने अश्लील व्हिडिओची शूटिंग करण्यात भाग पाडण्यात आले होते. दोन्ही तरुणींनी मुंबईतील मढ आयर्लंडमधील एका बंगल्यात ही व्हिडिओ शूटिंग झाल्याचे सांगितले आहे. (Pornography Case: Gehana Vasisth & Rowa Khan accused of forcefully shooting the porn videos & threatening the victim)

पीडित तरुणींची कहाणी

या प्रकरणात दोन्ही पीडित तरुणींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार एका पीडित तरुणीने रोवा खानवर धमकावण्याचा आणि दबावात घेऊन जबरदस्तीने अश्लील व्हिडिओचे शूटिंग करायला भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तर दुसऱ्या पीडित तरुणीने गहना वशिष्ठवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला घाबरून-धमकाऊन आपल्याशी लैंगिक संबंध करण्यात आल्याचा आरोप या पीडित तरुणीने केला आहे.

अशी झाली गहना वशिष्ठबरोबर पीडित तरुणीची भेट

दुसरी पीडित तरुणी फक्त २० वर्षांची आहे. २०१६ पासून ती हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करते आहे. यादरम्यान तिची अजित नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. अजितनेच पीडित तरुणीची भेट १० जानेवारी २०२१ला कास्टिंग डायरेक्टर नरेश आणि मितुल यांच्याशी घडवून आणली. एका कॉन्फरन्स कॉलच्या वेळेस नरेशने पीडित तरुणीला एका वेब सीरीजची ऑफर दिली. ती एका क्वीनची कहाणी होती. नरेशने तिला सांगितले की या वेब सीरीजची शूटिंग मढ आयर्लंड येथे होते आहे. यामध्ये काम करण्यासाठी १०,००० रुपये मिळतील असे सांगण्यात आले. पीडिताच्या सांगितले आहे की नरेशने मला मालाड स्टेशनजवळ भेटण्यास सांगितले. त्यानंतर तो मला मालवणी भागातील ग्रीन पार्क बंगल्यात घेऊन गेला. तिथे मला नरेशने सांगितले की या वेब सीरीजची निर्माती आणि दिग्दर्शक गहना वशिष्ठ आहे. माझा मेकअप करणाऱ्याचे नाव उमेश होते. थोड्या वेळाने गहनाने माझ्याकडे काही कपडे आणले आणि ते कपडे घालून मी बंगल्यातील बागेत शूटिंग करण्यासाठी गेली. तिथे गहना वशिष्ठने मला माझ्या भूमिकेविषयी समजावले. हे वेब सीरीज एक राज, त्याची रानी आणि तीन बुटक्यांची असल्याचे तिने सांगितले.

गहनाने जबरदस्ती केली शूटिंग

पीडित तरुणीने आपल्या आरोपात म्हटले आहे की गहनाने त्यानंतर तिला नवीन कपडे घालण्यात दिले. मात्र पीडित तरुणीने नकार देताच आणि आपल्या घरी जायचे आहे असे सांगताच गहना वशिष्ठने तिला धमकावले. गहनाने तिला सांगितले की सीरीजच्या शूटिंगसाठी तिने १० लाख रुपये खर्च केले आहेत. जर तू निघून गेलीस तर माझे १० लाख रुपयांचे नुकसान होईल. ते तुझ्याकडून वसूल करण्यात येईल. त्यावर पीडित तरुणीने तिला सांगितले की तिच्याकडे पैसे नाहीत. यानंतर आकाश नावाचा एक तरुण तिच्या खोलीत आला आणि पीडित तरुणीशी तो सेक्स करण्याचा प्रयत्न करू लागला. जबरदस्ती करूनच याचे शूटिंग करण्यात आले. एकदा शूटिंग झाल्यावर पीडित तरुणीने मला जाऊ द्या अशी विनवणी केली. मात्र गहनाने तिला पुन्हा धमकावले आणि सांगितले की या शूटिंगबद्दल तिने कोणालाही सांगू नये किंवा पोलिसांकडेदेखील जाऊ नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील.

पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या पीडित तरुणींची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यांनी आपल्या जबाबात गहना वशिष्ठ आणि रोवा खान यांनी जबरदस्तीने पॉर्न व्हिडिओ बनवून घेतल्याचा आरोप केला आहे. गहनाला आता क्राइम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागणार आहे. शिवाय तिला या पॉर्नोग्राफी प्रकरणात स्वत:चा जबाब नोंदवावा लागणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी