मुंबई: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेचा (Arrest of Raj Kundra) प्रत्यक्ष परिणाम शिल्पा शेट्टीवर (Shilpa Shetty) होतो आहे. शिल्पा शेट्टीच्या 'सुपर डांसर चॅप्टर ४' च्या (Super Dancer Chapter 4) चित्रीकरणाला याचा फटका बसला आहे. मागील आठवड्यापासून शिल्पा शेट्टी 'सुपर डांसर' या डान्स शोमधून गायब झाली आहे. शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थितीत करिश्मा कपूरने तिसऱ्या जजची जबाबदारी सांभाळली होती. आगामी आठवड्यातसुद्धा शिल्पा शेट्टी या शोचे चित्रीकरण करणार नाही आणि त्यामुळे अर्थात या शोमध्ये शिल्पा शेट्टी पुढील आठवड्यात देखील दिसणार नाही अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्याऐवजी रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जेनेलिया देशमुख (Genelia D’souza)हे बॉलीवूडचे स्टार (Bollywood star)दांपत्य गीता कपूर (Geeta Kapoor)आणि अनुराग बसू (Anurag Basu)यांच्यासोबत जजच्या भूमिकेत दिसणार आहे. (Raj Kundra : Shilpa Shetty may be replaced in 'Super Dancer Chapter 4' by Riteish Deshmukh & Genelia D’souza)
जेव्हा सुपर डांसरच्या निर्मात्यांकडून रितेश आणि जेनेलिया यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच या शोसाठी होकार दिला आहे. या दोघांनाही हा शो आवडतो. त्यामुळे या शोची ऑफर या दोघांना देण्यात आल्यानंतर ते तात्काळ तयार झाले. रितेश आणि जेनेलिया यांच्या शैलीमुळे स्पर्धक त्यांच्याबरोबर धमाल करण्याची शक्यता आहे. मंगळवारीच 'सुपर डांसर चॅप्टर ४'च्या एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केले जाणार आहे. नव्या एपिसोडमध्ये हे दांपत्य नाचतानाही दिसण्याची शक्यता आहे.
'सुपर डांसर चॅप्टर ४'ची जज शिल्पा शेट्टीला राज कुंद्राच्या अटकेचा जबरदस्त धक्का आणि फटका बसला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा सेट्टी घराबाहेरच पडलेली नाही. सूत्रींनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीचा सोनी टीव्हीशी मागील काही दिवसांपासून कोणताही संवाद झालेला नाही. त्यामुळेच 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीनुसार या शोच्या निर्माते पाहुणे जज आणि कायमस्वरुपी जज गीता कपूर, अनुराग बसू यांच्यासह 'सुपर डांसर चॅप्टर ४'चा शो पुढे नेत आहेत.
राज कुंद्राची अटक आणि या सर्व प्रकरणाने जे गंभीर वळण घेतले आहे, ते पाहता नजीकच्या काळात शिल्पा शेट्टीचे 'सुपर डांसर चॅप्टर ४' मध्ये पुनरागमन होणे अवघड आहे. एका बाजूला राज कुंद्रा प्रकरण आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता कदाचित शिल्पा शेट्टी पुढील सीझनमध्येच प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थितीत तिची जागा आता शोमध्ये पाहुणे जज बनून आलेले कलाकार घेणार आहेत. मागील आठवड्यातच करिश्मा कपूरने सर्व स्पर्धकांना ग्रॅंड सॅल्यूट दिला होता.