पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झालेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची कहाणी, राजकडे किती आहे संपत्ती?

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jul 20, 2021 | 18:55 IST

Raj Kundra Net Worth: राज कुंद्रासाठी वाद ही काही नवी बाब नव्हे. याआधीही राज कुंद्रा (Raj Kundra) अनेक वादांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र यावेळेस प्रकरण जरा जास्तच गंभीर होताना दिसते आहे. राजकडे अब्जावधी रुपये.

Raj Kundra Net Worth
राज कुंद्राकडे आहे अब्जावधींची संपत्ती 
थोडं पण कामाचं
  • राज कुंद्राच्या करियर सुरूवात कशी झाली
  • राज कुंद्राने कसे मिळवले व्यावसायिक यश
  • राज कुंद्राकडे आहे अब्जावधींची संपत्ती

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Businessman Raj Kundra) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करण्याच्या आणि त्याचे प्रदर्शन काही अॅपद्वारे करण्याच्या प्रकरणात (Raj Kundra Arrested in Porn Films Case) राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (Crime Branch, Mumbai Police) अटक केली आहे. अर्थात राज कुंद्रासाठी वाद ही काही नवी बाब नव्हे. याआधीही राज कुंद्रा (Raj Kundra) अनेक वादांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र यावेळेस प्रकरण जरा जास्तच गंभीर होताना दिसते आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती आणि ब्रॉडकास्टिंग हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळेच यावेळेस राज कुंद्रा अडचणीत सापडतो का याकडे सर्वांचेच लक्ष आहे. राज कुंद्रा हा एक व्यावसायिक आहे. विविध व्यवसायांच्या कंपन्यांमध्ये त्याची भागीदारी आहे. राज कुंद्रा (Raj Kundra Net Worth) हा एक अब्जाधीश व्यावसायिक आहे. शिल्पा शेट्टीच्या पतीकडे नेमकी किती संपत्ती ते पाहूया. (Shilpa Shetty's husband & Businessman Raj Kundra's Story & his net worth)

राज कुंद्राची सुरूवात

लंडनमध्ये ९ सप्टेंबर १९७५ ला राज कुंद्राचा जन्म झाला असला तरी तो मूळ भारतीय वंशाचाच आहे, मात्र त्याच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे. तो इंग्लंडमधील एक प्रथितयश व्यावसायिक आहे. राज कुंद्राचे वडील अनेक वर्षांपूर्वी पंजाबमधील लुधियाना येथून लंडन येथे गेले होते. लंडनमध्ये त्यांनी बस कंडक्टरच्या नोकरीने सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. राज कुंद्राची आई एका दुकानात असिस्टंटचे काम करायची. कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून राज कुंद्राला पैशाचे महत्त्व लहानपणीच आले होते. वयाच्या १८ वर्षीच राजने काम करण्यास सुरूवात केली होती.

राज कुंद्राची व्यावसायिक भरारी

आपल्या वडीलांच्या सल्ल्यानुसार राज थोडेफार पैसे घेऊन दुबईला गेला आणि तिथे त्याने काही हिरे व्यापाऱ्यांबरोबर आपला व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे त्याची डाळ शिजली नाही. यानंतर राज नेपाळला गेला आणि तेथून पश्मीना शाल विकत घेऊन त्या इंग्लंडमधील ब्रॅंडेड स्टोअरमध्ये विकण्याचा व्यवसाय सुरू केला. यात राजला यश आले आणि तो काही काळानंतर हिऱ्याच्या व्यवसायासाठी पुन्हा दुबईला गेला आणि यावेळेस त्याला यश मिळाले. २००४मध्ये वयाच्या फक्त २९व्या वर्षी राज कुंद्रा इंग्लंडमधील आशियाई श्रीमंतांच्या यादीत १९८व्या क्रमांकावर पोचला होता.

राज कुंद्राकडे आहे अब्जावधींची संपत्ती (Raj Kundra Net Worth)

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे नाव आज देशातील आघाडीच्या बिझनेसमनमध्ये समाविष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मागील एका दशकातच राज कुंद्राच्या संपत्तीत ८० टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. सध्या राजकडे विविध क्षेत्रातील जवळपास १० कंपन्यांची मालकी किंवा हिस्सेदारी आहे. राज कुंद्रा दर महिन्याला जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करतो. राज कुंद्राची एकूण संपत्ती ४० कोटी डॉलर म्हणजे जवळपास २,७०० कोटींपेक्षाही अधिक आहे.

खासगी आयुष्यातील वाद

राज कुंद्राचे खासगी आयुष्यदेखील वाद निर्माण झाले आहेत. २००५ मध्ये त्याने कविताशी लग्न केले होते. मात्र लग्नानंतर तीन वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला होता. राज आणि कविताला एक मुलगीदेखील आहे, ती आता तिच्या आईसोबत म्हणजे कविताबरोबर राहते.
कविताचा राजबरोबर घटस्फोट झाल्यानंतर राज कुंद्राने २००९ मध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याशी लग्न केले होते. राज आणि शिल्पा या दांपत्याला दोन मुले आहेत. मुलाचे नाव वियान आहे तर मुलीचे नाव समिशा आहे. राज कुंद्राच्या पहिल्या घटस्फोटात शिल्पा शेट्टीचा हात होता अशा बातम्यांच्या चर्चा अधूनमधून होत राहिल्या. मात्र राज कुंद्रा या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगत आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी