शिल्पा शेट्टीच्या आईची १.६ कोटी रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात तक्रार

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jul 29, 2021 | 16:19 IST

आता शिल्पा शेट्टीची आई प्रकाशझोतात आली आहे. शिल्पा शेट्टीच्या आईने एक फसवणुकीची तक्रार केली आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टीने १.६ कोटी रुपयांच्या जमीन व्यवहार व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार केली आहे.

Sunanda Shetty, mother of Shilpa Shetty
शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी 
थोडं पण कामाचं
  • शिल्पा शेट्टीच्या आईने विकत घेतली होती १.६ कोटी रुपयांना जमीन
  • जमीन विकणाऱ्या माणसाने बोगस कागदपत्रांद्वारे व्यवहार केल्याची शिल्पाच्या आईची तक्रार
  • शिल्पाच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

मुंबई: राज कुंद्राच्या (Raj Kundra)अटकेनंतर बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Bollywood actress Shilpa Shetty)आणि तिचे कुटुंबिय सतत चर्चेत असताना आता शिल्पा शेट्टीची आई (Shilpa Shetty's mom) प्रकाशझोतात आली आहे. शिल्पा शेट्टीच्या आईने एक फसवणुकीची तक्रार केली आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty, mother of Shilpa Shetty)हिने जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. सुधाकर घरे यांच्यावर १.६ कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची तक्रार करण्यात आली आहे. सुधाकर घरे यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाअंतर्गत संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Shilpa Shetty's mom files cheating complaint in land deal of Rs 1.6 crore)

राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत

दरम्यान राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्यामुळे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हॉटस्पॉट अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफिक फिल्म्सची निर्मिती आणि प्रदर्शन करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यावेळेस या प्रकरणासंदर्भात शिल्पा शेट्टीचा जबाबदेखील पोलिसांनी घेतला होता.

राज कुंद्राचा पॉर्न फिल्म्सचा व्यवसाय

पॉर्न फिल्म्सच्या या प्रकरणात आर्म्सप्राईम (ArmsPrime) नावाच्या कंपनीचे नाव समोर आले आहे. या कंपनीचे संस्थापक सौरभ कुशवाह यांनी मुंबई गुन्हे शाखेला सांगितलं की 2019 मध्ये 85 लाख रुपयांची गुंतवणुकीसह राज अॅपच्या व्यवसायात आले.  पोलीस आता हॉटस्पॉट्स ( HotShots) आणि आर्म्सप्राईम ( ArmsPrime) कंपनी मध्ये राज कुंद्रसोबत काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहे. दरम्यान पोलिसांनीआर्म्सप्राईम ( ArmsPrime) या कंपनीचे संस्थापक सौरभ कुशवाह यांचा जबाब नोंदवला आहे.  सौरभ कुशवाहा यांनी माहिती दिली आहे की, 'राज कुंद्रा यांना ही कल्पना खूप आवडली आणि माझ्या व्यवसायात 2 कोटी 70 लाख रुपये गुंतवून कंपनीत ते संचालक होण्यास तयार झाले. तथापि, नंतर फक्त 85 लाख रुपयांची गुंतवणूक करून ते कंपनीत संचालक बनले आणि अशाप्रकारे आर्म्सप्राईम ( ArmsPrime)सुरू केले.

'सुपर डांसर चॅप्टर ४'मध्ये रितेश आण जेनेलियाची एन्ट्री तर शिल्पाला डच्चू

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीची चौकशी पोलिस करत आहेत. त्यामुळे ती अनेक दिवसांपासून घराबाहेर पडलेली नाही. 'सुपर डांसर चॅप्टर ४' हा शो सादर करणाऱ्या चॅनेलशीही तिचे याबाबत काहीही बोलणे झालेले नाही. त्यामुळे या शोच्या चित्रीकरणासंदर्भात बरीच साशंकता निर्माण झाली असताना सुपर डांसरच्या निर्मात्यांकडून रितेश आणि जेनेलिया यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच या शोसाठी होकार दिला आहे. या दोघांनाही हा शो आवडतो. त्यामुळे या शोची ऑफर या दोघांना देण्यात आल्यानंतर ते तात्काळ तयार झाले. रितेश आणि जेनेलिया यांच्या शैलीमुळे स्पर्धक त्यांच्याबरोबर धमाल करण्याची शक्यता आहे. मंगळवारीच 'सुपर डांसर चॅप्टर ४'च्या एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केले जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी