अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल

बी टाऊन
Updated Dec 25, 2020 | 14:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट सुपरस्टार अभिनेते रजनीकांत त्यांच्या अन्नात्थे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये आहेत. सिनेमाच्या सेटवरील चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चित्रीकरण थांबवण्यात आले.

Rajinikanth
रक्तदाबातील अस्थिरतेमुळे रजनीकांत रुग्णालयात दाखल, चित्रपटाच्या संचातील चौघांना कोरोनाची लागण 

थोडं पण कामाचं

  • रजनीकांत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत
  • रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याने दिला होता काळजी घेण्याचा सल्ला
  • लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत रजनीकांत

नवी दिल्ली: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना रक्तदाबात खूप अस्थिरता (blood pressure fluctuations) आढळल्याने रुग्णालयात दाखल (admitted to hospital) करण्यात आले आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट (Southern superstar) सुपरस्टार अभिनेते रजनीकांत त्यांच्या अन्नात्थे (Annatthe) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी (shooting) हैदराबादमध्ये (Hyderabad) आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला सिनेमाच्या सेटवरील (film crew) चार लोक कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळल्याने शूटिंग रद्द करण्यात आले. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयाने (Apollo Hospital) दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह (corona negative) आली आहे.

रजनीकांत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना कोव्हिड-19ची कोणतीही लक्षणे नव्हती, मात्र त्यांचा रक्तदाब खूप अस्थिर होता आणि यामुळे त्यांना आवश्यक उपचारांची गरज होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या केल्या जातील आणि त्यांचा रक्तदाब सामान्य होईपर्यंत त्यांच्यावर देखरेख ठेवली जाईल आणि नंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. रक्तदाब आणि थकवा सोडता त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचीही माहिती रुग्णालयाने दिली आहे.

रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याने दिला होता काळजी घेण्याचा सल्ला

ऑक्टोबर महिन्यात रजनीकांत यांनी अशी कबूली दिली होती की त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून डॉक्टरांनी त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोनावरची लस हा एकमेव उपाय नसून या लसीचा स्वीकार शरीर करेल की नाही याची खात्री नसल्याचेही डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. माध्यमांमध्ये फुटलेल्या कथित रुपाने रजनीकांत यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांची तब्येत सुधारल्यावरही त्यांना राजकारणात प्रवेश करण्यात रस नसल्याचे त्यांनी लिहिले असल्याचे बोलले जात होते, मात्र ते पत्र त्यांचे नसले तरी त्यांच्या तब्येतीविषयी त्यात लिहिलेल्या गोष्टी सत्य असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

लवकरच राजकारणात प्रवेश करणार 

रजनीकांत यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या संघटनेशी चर्चा करून आपण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आणि स्वतःचा पक्ष काढणार असल्याची माहिती दिली होती. त्यांचा नवा पक्ष चार महिन्यात होणारी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी