Rajinikanth honoured by Income Tax : चेन्नईच्या IT विभागाकडून रजनीकांत यांचा सन्मान, कारण ऐकून तुम्हाला ही वाटेल अभिमान

बी टाऊन
Updated Jul 25, 2022 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rajinikanth honoured by Income Tax : नियमितपणे कर भरणारे अभिनेता रजनीकांत यांचा चेन्नईतील आयकर विभागाने गौरव केला आहे.रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने हा पुरस्कार स्वीकारला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ऐश्वर्या रजनीकांतने ही अपडेट रजनीकांत यांच्या चाहत्यांना दिली आहे.

Rajinikanth honoured by Income Tax
रजनीकांत यांचा आयकर विभागाकडून सन्मान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नियमित करदाते म्हणून ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा चैन्नई आयकर विभागाकडून सन्मान
  • रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने स्वीकारला पुरस्कार
  • वडिलांच्या सन्मानाबद्दल ऐश्वर्याने आयकर विभागाचे आभार मानले आहेत

Rajnikanth honoured by Income Tax : नियमितपणे कर भरणारा अभिनेता रजनीकांत (Rajnikanth ) यांना चेन्नईतील आयकर विभागाने ( Income Tax department ) सन्मानित केले आहे. रविवारी, रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने इंस्टाग्रामवर रजनीकांत यांच्या चाहत्यांसह हे अपडेट शेअर केले.रविवारी चेन्नईत आयकर दिन साजरा करण्यात आला. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी होत्या जिथे ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. "उच्च आणि तत्पर करदात्याची मुलगी असल्याचा अभिमान आहे". #incometaxday2022 #onbehalfofmyfather. अप्पांचा सन्मान केल्याबद्दल तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या #incometax विभागाचे खूप खूप आभार," असे पोस्ट करत ऐश्वर्या रजनीकांतने 
सन्मान पत्र प्राप्त करतानाचे फोटोही पोस्ट केले आहेत. ( Rajinikanth honoured by Income Tax department for the regular tax payer Chennai)

ऐश्वर्याने ही बातमी शेअर करताच, चाहत्यांनी रजनीकांतचे अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स करायला सुरुवात केली. "थलाईवाचा चाहता असल्याचा अभिमान वाटतो," असे एका सोशल मीडिया यूजरने म्हटले आहे. "थलाईवाचे अभिनंदन. रजनीकांत सर नक्कीच जबाबदार नागरिक आहेत," असे दुसऱ्याने लिहिले.

अधिक वाचा : कोट्यवधी युजर्सचा पर्सनल डेटा विक्रीसाठी उपलब्ध

रजनीकांत यांनी चित्रपट निर्माते नेल्सन दिलीपकुमार यांच्यासोबत जेलर नावाच्या नवीन चित्रपटासाठी काम केले आहे. कन्नड अभिनेता शिवराजकुमार मुख्य भूमिकेत असणारा हा सिनेमा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 


रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चन ही मुख्य भूमिका साकारण्यासाठी चर्चा करत आहे. वृ्त्तांवर विश्वास ठेवला तर हे दोघं 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करतील, याआधी तेलुगुमध्ये रोबो नावाच्या ब्लॉकबस्टर चित्रपट इथिरनमध्ये काम केले होते. रजनीकांत शेवटचे शिवा दिग्दर्शित अन्नत्थेमध्ये दिसले होते. 

अधिक वाचा :  या 4 गोष्टींनंतर अंघोळ करायला विसरू नका, नाहीतर..


रजनीकांत यांनी शनिवारी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विविध सन्मान जिंकल्याबद्दल अभिनेता सुरिया आणि इतरांचे कौतुक केले. शुक्रवारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि सुर्याने अजय देवगणसोबत 'सूरराई पोत्रू'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शेअर केला.


या चित्रपटाने शालिनी उषा नायर आणि दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा तसेच GV प्रकाश कुमार यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (Background Score) जिंकले. 
एका ट्विटमध्ये रजनीकांत यांनी सूर्या, कोंगारा आणि पुरस्कार जिंकणाऱ्या इतर सर्वांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी