रजनीकांतला फाळके पुरस्कार, सोमवारी होणार सोहळा

सिनेसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार उद्या (सोमवार २५ ऑक्टोबर २०२१) दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांतून लोकप्रिय झालेला अभिनेता रजनीकांत याला दिला जाणार आहे.

Rajinikanth to be conferred with Dadasaheb Phalke Award tomorrow
रजनीकांतला फाळके पुरस्कार, सोमवारी होणार सोहळा 
थोडं पण कामाचं
  • रजनीकांतला फाळके पुरस्कार, सोमवारी होणार सोहळा
  • अमिताभ बच्चनला ५०वा दादासाहेब फाळके पुरस्कार तर रजनीकांतला ५१ वा फाळके पुरस्कार
  • भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने दिली माहिती

नवी दिल्ली: सिनेसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार उद्या (सोमवार २५ ऑक्टोबर २०२१) दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांतून लोकप्रिय झालेला अभिनेता रजनीकांत याला दिला जाणार आहे. चाहते रजनीकांतला थलायवा या नावानेही ओळखतात. त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. Rajinikanth to be conferred with Dadasaheb Phalke Award tomorrow

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारच्यावतीने सिनेसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार रजनीकांतला देणार असल्याचे एप्रिल २०२१ मध्ये त्यावेळचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते. भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने आज (रविवार २४ ऑक्टोबर २०२१) ट्वीट करुन पुरस्कार सोहळा उद्या (सोमवार २५ ऑक्टोबर २०२१) होणार असल्याचे जाहीर केले.

यंदा ५१वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा मानाचा पुरस्कार रजनीकांत याला दिला जाणार आहे. याआधी ५०वा दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलिवूडचे शहेनशहा बिगी बी अर्थात अमिताभ बच्चन याला देण्यात आला.

अमिताभ बच्चनला २०१८चा फाळके पुरस्कार देण्यात आला. यानंतर २०१९चा फाळके पुरस्कार वितरणाचा सोहळा कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आला. आता कोरोना संकट नियंत्रणात येऊ लागल्यामुळे २०१९च्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण २०२१च्या ऑक्टोबर महिन्यात होत आहे. आधीच जाहीर केल्याप्रमाणे ५१वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांतला दिला जाईल.

अनोखा योगायोग

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी १९९१ मध्ये 'हम' या हिंदी सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या आधी १९८४ मध्ये अमिताभला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. नंतर अमिताभला २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याला २०१८ मध्ये ५०वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. तर रजनीकांतला २००० मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याला उद्या ५१वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येईल.

रजनीकांतची कारकिर्द

रजनीकांतने १९७५ मध्ये के. बालचंद्र यांच्या 'अपूर्व रागंगल' सिनेमातून पदार्पण केले. तो ४५ वर्ष सिनेसृष्टीत काम करत आहे. कबाली, दरबार हे अलिकडच्या काळातील त्याचे चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत. रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला 'अन्नत्थे' गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी