Rajinikanth : अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाप्रमाणे पुजले जाणारे सुपरस्टार 'रजनीकांत' यांना 2019 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Rajinikanth Will Receive The Dadasaheb Phalke Award For 2019
अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाप्रमाणे पुजले जाणारे सुपरस्टार 'रजनीकांत' यांना 2019 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो.
  • केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

नवी दिल्ली :  दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाप्रमाणे पुजले जाणारे सुपरस्टार 'रजनीकांत' यांना 2019 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

'भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आनंद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे.' या आशयाचे ट्विट जावडेकर यांनी केलं आहे.

सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. रजनीकांत हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाप्रमाणे चाहते त्यांना प्रेम करतात.  आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे. सुपरस्टार रजनीकांतचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी आजारी पडल्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. अशात रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून केंद्रातील मोदी सरकारने फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी