Aishwaryaa Rajinikanth-Dhanush Separated: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि जावई धनुषचे नाते संपुष्टात, 18 वर्षांचा संसार मोडणार

बी टाऊन
Updated Jan 18, 2022 | 00:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dhanush Separated-Aishwaryaa Rajinikanth: सुप्रसिद्ध सिनेस्टार आणि तमिळ चित्रपटांचा अभिनेता धनुषने त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून विभक्त झाल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

Dhanush announce sepration with daughter of Rajinikanth aishwarya
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचे 18 वर्षांचे नाते संपुष्टात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचे 18 वर्षांचे नाते संपुष्टात
  • तब्बल 18 वर्षांचा संसार मोडणार
  • अभिनेता धनुषने ट्विट करून दिली माहिती

Dhanush announce sepration with daughter of rajinikanth aishwarya: तामिळ चित्रपटांचा सुप्रसिद्ध सिनेस्टार आणि नुकताच 'अतरंगी रे' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता धनुषने त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून विभक्त झाल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

धनुषने पोस्टमध्ये लिहीलं आहे, "१८ वर्षांचा सहवास, मैत्री, एक चांगले कपल होणे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक, आमची ग्रोथ, समजूतदारपणाचा, एकत्र प्रवास आम्ही केला. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर आज, आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वत:ला शोधण्याचानिर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची प्रायव्हसी लक्षात घेऊन आम्हाला आमच्या या निर्णयाशी डील करू द्या"

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने तीच पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आणि लिहिले आहे, "कोणत्याही कॅप्शनची गरज नाही... फक्त तुमचा समजूतदारपणा आणि तुमचे प्रेम हवे आहे !"

ऐश्वर्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. दोघांनी 2004 मध्ये लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. यादरम्यान अनेकवेळा या कपलच्या विभक्त झाल्याच्या बातम्या आल्या आहेत, मात्र अनेकदा ते मीडियाचे प्रश्न टाळताना दिसले. 

धनुष हा सुप्रसिद्ध निर्माती कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष बहुप्रतिभावान आहे. अभिनेता असण्यासोबतच ते दिग्दर्शक, निर्माता, नर्तक, पार्श्वगायक, गीतकार आणि पटकथा लेखक देखील आहेत. 46 चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुपरस्टार धनुषला आतापर्यंत एक फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह 13 मोठे पुरस्कार मिळाले आहेत. 

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर चाहत्यांची नाराजी असतानाच साऊथ इंडस्ट्रीतील आणखी एका पॉवर कपलने घटस्फोटाची घोषणा केली आहे. 
सोशल मीडियाद्वारे धनुषने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी