सुशांतच्या मृत्यूनंतर रोडीजच्या राजीवसोबत दिसली रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला जवळपास सात महिने झाले असताना रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Rajiv Lakshman deletes pictures with Rhea Chakraborty
सुशांतच्या मृत्यूनंतर रोडीजच्या राजीवसोबत दिसली रिया 

थोडं पण कामाचं

  • सुशांतच्या मृत्यूनंतर रोडीजच्या राजीवसोबत दिसली रिया
  • फोटोत रिया आणि राजीव लक्ष्मण एकमेकांच्या मिठीत आनंदात
  • सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियावर आहे संशय

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला जवळपास सात महिने झाले असताना रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या रिया चक्रवर्ती मुंबईच्या जुहू ते वांद्रे या पट्ट्यात नवे घर शोधत आहे. अलिकडेच रियाने काही घरे बघितली. तसेच एका खासगी पार्टीतही ती उपस्थित होती. रोडीज फेम राजीव लक्ष्मण याच्या सोबतचा रिया चक्रवर्ती हिचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोवरुन सुशांतच्या चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. (Rajiv Lakshman deletes pictures with Rhea Chakraborty) 

सुशांतच्या मृत्यूनंतर रोडीजच्या राजीवसोबत दिसली रिया

सुशांतचा (Actor Sushant Singh Rajput) मृत्यू १४ जून २०२० रोजी झाला. त्याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआयचा (Central Bureau of Investigation - CBI) तपास सुरू आहे. कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन सुरू असताना सुशांतच्या घरात ड्रगचा पुरवठा होत होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) सुशांत प्रकरणातील ड्रगच्या संदर्भांचा तपास सुरू केला. ड्रग प्रकरणात काही काळ रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) या दोघांना तुरुंगात जावे लागले. सध्या दोघे सशर्त जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. अलिकडेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबईतील कार्यालयात आले होते. ठराविक कालावधीनंतर नियमित हजेरी लावण्याच्या बंधनाचे पालन करण्यासाठी ते तिथे आले होते. यानंतर काही दिवसांतच रिया चक्रवर्ती हिचा रोडीज फेम राजीव लक्ष्मण (Rajiv Lakshman) याच्या सोबतचा फोटो व्हायरल झाला. 

फोटोत रिया आणि राजीव लक्ष्मण एकमेकांच्या मिठीत आनंदात

फोटोत रिया चक्रवर्ती आणि रोडीज फेम राजीव लक्ष्मण यांनी एकमेकांना मिठीत घेतल्याचे दिसत आहे. दोघे अतिशय आनंदात दिसत आहेत. हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकून राजीव लक्ष्मणने माय गर्ल अशी फोटो ओळ (फोटो कॅप्शन) दिली होती. रियाचा फोटो व्हायरल झाला आणि सुशांतच्या चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या. यानंतर राजीव लक्ष्मण याने स्वतःच्या इन्स्टाग्रामवरुन हा फोटो काढून टाकला आणि नवी पोस्ट टाकली. ही पोस्ट टाकताना त्याने प्रतिक्रिया देण्याचा पर्याय बंद करण्याची खबरदारी घेतली. नव्या पोस्टमध्ये नागरिकांच्या भावना नकळतपणे दुखावल्या म्हणून राजीव लक्ष्मणने माफी मागितली. 'रिया चक्रवर्ती माझी जुनी मैत्रीण आहे आणि अनेक दिवसांनंतर तिला भेटल्यामुळे आनंद झाला. रियाला शुभेच्छा'; असे राजीव लक्ष्मणने नव्या पोस्टमध्ये नमूद केले.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियावर आहे संशय

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर संशय घेतला गेला. हा संशय आजही कायम आहे. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. तुरुंगात जावे लागल्यानंतर रियाने सोशल मीडियातील सर्व अकाउंटवरुन एकदम रजा घेतली. अद्याप ती सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह झालेली नाही. मात्र रोडीजच्या राजीव लक्ष्मण याने टाकलेला रियासोबतचा फोटो व्हायरल झाला. यामुळे रियाचे जीवन आनंदात सुरू असल्याचे चित्र सुशांतच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आणि त्यांनी आपापली मते व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी