Rajkummar Raoनं खरेदी केलेल्या नव्या बाईकची किंमत ऐकून व्हाल थक्क!

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Oct 15, 2019 | 21:50 IST

Rajkummar Rao Buy A Brand New Bike: राजकुमार राव सध्या आपल्या नव्या बाईकमुळे खूप चर्चेत आहे. राजकुमारनं ब्रॅन्ड न्यू हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब बाईक खरेदी केली आहे.

Rajkumar rao
Rajkummar Raoनं खरेदी केलेल्या बाईकची किंमत ऐकून व्हाल थक्क!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अॅक्टर राजकुमार राव सध्या आपल्या नव्या बाईक खरेदीमुळे बराच चर्चेत आहे.
  • राजकुमारनं ब्रॅन्ड न्यू हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब बाईक खरेदी केली आहे.
  • राजकुमार रावनं मुंबई शोरूममधून स्वतःला नवीन गाडी गिफ्ट केली आहे.

स्त्री, शादी में जरूर आना, न्यूटन आणि सिटीलाइट्स यासारखे सिनेमे देणारा बॉलिवूड अॅक्टर राजकुमार राव सध्या आपल्या नव्या बाईक खरेदीमुळे बराच चर्चेत आहे. राजकुमारनं ब्रॅन्ड न्यू हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब बाईक खरेदी केली आहे. हो खरंच, राजकुमार रावनं मुंबई शोरूममधून स्वतःला नवीन गाडी गिफ्ट केली आहे. मुंबई बेस्ड हार्ले डेव्हिडसन डीलरनं सोशल मीडियावर राजकुमार रावचे फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. 

राजकुमार राव या फोटोमध्ये आपली ब्लॅक कलरची ब्रॅन्ड न्यू हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब बाईकवर बसून पोज देताना दिसत आहे. यावेळी त्यानं ब्लॅक कॅज्युअल टीशर्ट, लोअर आणि गॉगल लावला आहे. राजकुमारनं नवीन बाईक घेतल्यानं डीलर्स अभिनंदन करताना दिसत आहे. त्यासोबतच हार्ले कुटुंबात आल्यानं राजकुमारचं स्वागतही केलं आहे. मुंबई बेस्ड हार्ले डेव्हिडसन डीलरनं फोटो शेअर करत लिहिलं की, राजकुमार राव यांना ब्रॅन्ड न्यू हार्ले डेव्हिडसनसाठी शुभेच्छा. सेवेन आयलॅंड हार्ले डेव्हिडसनच्या कुटुंबात आपलं स्वागत आहे. हार्ले डेव्हिडसन फॅट बॉबची ऑन रोड किंमत 16.5 लाख आहे. तर बाईकची एक्स शोरूम किंमत 14.69 लाख रूपये आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, राजकुमार सध्या अपकमिंग सिनेमा मेड इन चायनावरून चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा दिवाळीच्या निमित्तानं रिलीज होत आहे. सिनेमात राजकुमार रावच्या अपोझिट मौनी रॉय आहे आणि याची गाणी देखील खूप हिट होत आहेत. यासोबतच राजकुमार राव सध्या आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. अशी चर्चा आहे की, 1970 च्या दशकातली मोठा हिट सिनेमा चुपके चुपके याचा रिमेक बनत आहे आणि यात राजकुमार रावला साइन केलं आहे. पुणे मिररशी बातचीत करताना राजकुमार रावनं सांगितलं की, मी डॉक्टर परिमल त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणार आहे. ओरिजिनल सिनेमात ही भूमिका धर्मेंद्र यांनी साकारली होती. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी