कॉमेडिअन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड

Raju Srivastava Health Critical Brain Dead : प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाला आहे. त्याच्या हृदयाचे काम अनियमित झाले आहे.

Raju Srivastava Health Critical Brain Dead
कॉमेडिअन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कॉमेडिअन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड
  • कॉमेडिअन राजू श्रीवास्तवच्या हृदयाचे काम अनियमित झाले आहे
  • राजू श्रीवास्तववर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

Raju Srivastava Health Critical Brain Dead : प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाला आहे. त्याच्या हृदयाचे काम अनियमित झाले आहे. ही माहिती राजू श्रीवास्तववर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांना दिली आहे. राजू श्रीवास्तव याच्या शरीरातील अनेक भागांना ऑक्सिजन मिळणे थांबले आहे. यामुळे शरीरातील वेगवेगळे अवयव निकामी होऊ लागले आहेत. राजू श्रीवास्तव याचा चेहरा अधिकाधिक काळा होण्यास सुरुवात झाली आहे. 

सेक्स लाइफवर बोलला सिद्धार्थ मल्होत्रा

राजू श्रीवास्तव याच्या शरीराचा कंबरेखालील भाग अद्याप कार्यरत आहे. याच कारणामुळे डॉक्टरांनी अद्याप राजू श्रीवास्तवला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि मेंदूने पुन्हा काम करावे यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. 

जन्माष्टमीसाठी सेलिब्रिटी स्टाईल कॉश्चुम ऑप्शन

जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे राजू श्रीवास्तव बेशुद्ध पडला. त्याला १० ऑगस्ट २०२२ रोजी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर उपचार करत असले तरी राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीत आलेला नाही. आता तर ब्रेन डेड झाल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. 

सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, जियाच्या आईचा आरोप

राजूच्या हृदयाच्या एका भागात आधीपासूनच १०० टक्के ब्लॉकेज होते. अशातच हृदविकाराचा झटका आल्यानंतर राजू बेशुद्ध झाला आणि खाली पडला. यामुळे त्याच्या मेंदूची एक नस दबली. डॉक्टरांनी राजूच्या हृदयात दोन स्टेंट लावले आहेत. पण अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

सिद्धार्थ मल्होत्राने सांगितलं कियारा अडवाणीला करतोय डेट

राजूच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार मेंदूची एक नस दबली आहे आणि ही समस्या बरी होण्यास किमान दहा दिवस लागतील. राजू शुद्धीत नसला तरी त्याने हातापायांची थोडी हालचाल केली होती. यामुळेच राजूवरील उपचार सुरू ठेवायचे असा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. राजू लवकरच बरा होईल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी