Rakesh Roshal Video : करण अर्जुन चित्रपटाचे नाव होते 'कायनात', सलमान च्या जागी होता अजय देवगण, राकेश रोशन ने केला खुलासा

बी टाऊन
Updated Mar 26, 2023 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rakesh Roshal Video : 28 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला 'करण अर्जुन' हा ब्लॉकबस्टर सिनेमा चित्रपटगृहात तूफान गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. त्यांनी 'इंडियन आयडॉल 13' मध्ये या गोष्टीचा खुलासा करत म्हंटले की, 'करण अर्जुन' या चित्रपटाचे नाव पूर्वी 'कायनात' असे ठेवले होते आणि सलमान च्या जागी अजय देवगण होता.

करण अर्जुन फिल्मचे नाव होते कायनात, सलमानऐवजी होता अजय देवगण
सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन ने 'करण अर्जुन' चित्रपटाच्या नावाला घेऊन केला खुलासा  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन ने 'करण अर्जुन' चित्रपटाच्या नावाला घेऊन केला खुलासा
  • त्यांनी सांगितले सुरुवातीला या चित्रपटाचे नव 'कायनात' असे होते. 
  • राकेश रोशन यांनी सांगितले की सलमान च्या जागी अजय देवगण काम करणार होता.

Rakesh Roshan Reveals in indian idol 13  सिंगिंग रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल 13' मध्ये यावेळी सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन पाहुणे म्हणून आले होते. त्यादरम्यान त्यांना विचारले गेले की, तुमच्या अशा चित्रपटाबद्दल सांगा, ज्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याला ऑफर केली होती आणि त्याने काही कारणास्तव तो चित्रपट केला नव्हता. यावर राकेश रोशन यांनी 'करण अर्जुन' या चित्रपटाचे नाव घेतले. 'करण अर्जुन' चित्रपटाचे नाव पूर्वी कायनात असे ठेवले होते आणि त्यात सलमानच्या जागी अजय देवगण ला घेणार होतो, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. (rakesh roshan reveals in indian idol 13 that karan arjun movie name was kainaat ajay devgan in place of salman khan)

अधिक वाचा : ​मुंबई vs दिल्ली रंगणार WPL फायनल, येथे पाहा LIVE streaming

राकेश रोशन  यांनी  सांगितले की, 'कहो ना प्यार है' मध्ये पहिली करीना कपूर होती. मात्र काही कारणांमुळे ती हा सिनेमा करू शकली नाही. ते असे सुद्धा सांगतात की सुपरहिट चित्रपट 'करण अर्जुन' मध्ये सलमान च्या भूमिकेसाठी अजय देवगण होता, आणि या चित्रपटाचे पूर्वी नाव 'कायनात' असे होते, ज्यात शाहरुख खान आणि अजय देवगण अशी जोडी दिसणार होती. मात्र अजय हा सिनेमा करू शकला नाही, आणि सलमान खानची वर्णी झाली.

28 वर्षापूर्वी प्रदर्शित झाला 'करण अर्जुन' सिनेमा

'करण अर्जुन' हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटामध्ये सलमान खान, शाहरुख खान, राखी गुलजार, काजोल आणि ममता कुलकर्णी मुख्य भूमिकेत होत्या. अमरिश पुरी यांनी यात खलनायक साकारला होता. तर जॉनी लिवर, अर्जुन, जॅक गौड, रंजीत आणि आसिफ शेख सहाय्य कलाकाराच्या भूमिकेत दिसून आले. 

अधिक वाचा : ​HDFC बँकेत खाते आहे?असे ओळखा तुम्हाला येणारे SMS खरे की खोटे

'कहो ना प्यार है' मध्ये होती करीना कपूर, हृतिक रोशनला केले लॉंच

'कहो ना प्यार है' बाबत बोलायला गेले तर 2000 साली प्रदर्शित झालेली ही सुपरहिट फिल्म अभिनेता हृतिक रोशनची पदार्पण फिल्म होती. राकेश रोशन दिग्दर्शित, लिखित आणि निर्मित या चित्रपटाद्वारे त्यांनी आपला मुलगा हृतिक रोशनला बॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावर लॉंच केले होते. ज्यात अभिनेत्री अमीषा पटेलने देखील काम केले होते.

तिचा देखील हा बॉलीवूडमधील पदार्पण चित्रपट होता. खरे तर अमीषा पटेल च्या जागी करीना कपूरची यात भूमिका होती मात्र काही कारणास्तव करीना यात काम करू शकली नाही, आणि ती संधी अमिषाला मिळाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी