राकेश रोशन यांना रणबीर आणि ऋतिक यांच्यासोबत करायचा आहे एक चित्रपट

बी टाऊन
Updated May 02, 2021 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्या हाती येत असलेल्या माहितीनुसार राकेश रोशन यांना रणबीर कपूर आणि ऋतिक रोशन या दोघांना घेऊन एक चित्रपट करायचा आहे. हे ऋषी कपूर यांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करणारा हा चित्रपट लवकरच येणार आहे.

Ranbir Singh and Hritik Roshan
राकेश रोशन यांना रणबीर आणि ऋतिक यांच्यासोबत करायचा आहे एक चित्रपट  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • ऋषी आणि राकेश दोघांचीही मुले बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेते
  • राकेश रोशन यांनी मुलाखतीत दिले चित्रपटाचे संकेत
  • दोघांना चित्रपटात घेण्याजोगी कथा हातात नाही

नवी दिल्लीः बॉलीवुड अभिनेते (Bollywood actor) ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या मृत्यूला (death) नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने (friends) आणि बॉलिवुडच्या (bollywood) तारेतारकांनी (celebrities) आपापल्या पद्धतीने त्यांच्या स्मृती (memories) जागवल्या. राकेश रोशन (Rakesh Roshan) हे ऋषी कपूर यांचे खास मित्र (close friend) होते. 30 एप्रिल रोजी म्हणजेच ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राकेश रोशन हे त्यांची पत्नी (wife) पिंकी रोशनसह (Pinky Roshan) त्यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली (tributes) वाहिली.

ऋषी आणि राकेश दोघांचीही मुले बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेते

आज ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि राकेश रोशन यांचा मुलगा ऋतिक रोशन हे दोघेही बॉलिवुडमधले आघाडीचे अभिनेते आहेत. लोकांना या दोघांनाही पडद्यावर पाहायला आवडते. मात्र रणबीर आणि ऋतिक हे दोघे कधीही एकमेकांसोबत रुपेरी पडद्यावर दिसलेले नाहीत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची या दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्याची इच्छा होती. आता त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राकेश रोशन यांनी मुलाखतीत दिले चित्रपटाचे संकेत

राकेश रोशन हे रणबीर आणि ऋतिक या दोघांसह एक चित्रपट करणार आहेत. एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटावर काम करत असल्याचे सांगितले होते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, 'मी आणि माझी पत्नी काल ऋषीजींच्या घरी गेलो होते, तिथे आम्ही नीतू, रिद्धिमा आणि रणबीर यांना भेटलो. आम्ही 2-3 तास तिथे होतो. ऋषीबद्दलच्या अनेक आठवणींना आम्ही उजाळा दिला. मी रणबीरला आमचे अनेक किस्से सांगितले. जेव्हा मी आणि ऋषी तरुण होतो तेव्हा खूप मस्ती करत असू. मी त्यांना सुट्ट्यांबद्दलही सांगितले जिथे मी आणि ऋषी एकत्र जात असू आणि खूप मजा करत असू. लहानपणी रणबीर आणि ऋतिक या सुट्ट्यांमध्ये आमच्यासोबत असत. आता मी आशा करतो की लवकरच ते दोघे एकत्र एका चित्रपटातही दिसतील.’

दोघांना चित्रपटात घेण्याजोगी कथा हातात नाही

राकेश रोशन यांनी पुढे सांगितले की सध्या त्यांच्याकडे अशी कथा नाही ज्यात या दोघांना एकत्र भूमिका देता येईल. सध्या त्यांनी क्रिश 4 हा चित्रपटही स्थगित केला आहे. कोव्हिडच्या या संकटामुळे सर्व आयोजनावर पाणी पडले आहे. कोव्हिड-19 संपताच आम्ही या चित्रपटाचे काम सुरू करू. त्यांच्याकडे जर अशी साजेशी एखादी कथा आली तर ते या दोघांसह चित्रपट नक्की करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी