Ram Setu Box Office Day 1: अक्षय कुमारने मोडला त्याच्याच सिनेमांचा रेकॉर्ड, पाहा राम सेतूचे फर्स्ट डे कलेक्शन

बी टाऊन
Updated Oct 26, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ram Setu Box Office Day 1: अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) ही दिवाळी शुभ ठरली आहे. दिवाळीच्या दिवशी रिलीज झालेल्या राम सेतूने (Ram Setu) बंपर ओपनिंग केले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी अक्षयच्या गेल्या तीन सिनेमांपेक्षा जास्त ओपनिंग (Ram Setu Box Office Day 1) केले आहे.

Ram setu cinema box office first day collection
'राम सेतू' सिनेमाचे फर्स्ट डे कलेक्शन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद
  • 'राम सेतू' सिनेमाने अक्षयच्या आधीच्या तीन सिनेमांचा रेकॉर्ड मोडला
  • पहिल्या दिवशी सिनेमाने 15.25 कोटींची कमाई केलेली आहे.

Ram Setu Box Office Day 1: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. बॉलीवूडमधील दोन दिग्गज म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgan) आणि अक्षय कुमार ( Akshay Kumar) यांचे सिनेमा दिवाळीच्या दिवशी रिलीज झाला. प्रेक्षकांमध्ये दोघांचेही फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अक्षय कुमारच्या राम सेतू या सिनेमासोबतच अजय देवगणचा थँक गॉड  ( Thank God) हा सिनेमाही रिलीज  झाला आहे.अक्षय कुमारच्या सिनेमाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे सिनेमाची चांगली कमाई होईल अशी अपेक्षा होती आणि झालेही तसेंच. आता राम सेतूच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. अक्षयच्या सिनेमाने या वर्षात रिलीज झालेल्या त्याच्या सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे. (Ram setu cinema box office first day collection)

अधिक वाचा : ऐन दिवाळीत सामान्यांना महागाईचा झटका, भाज्यांचे दर वाढले

राम सेतूच्या पहिल्या दिवसाची म्हणजेच ओपनिंग डेची कमाई पाहिली तर अक्षयच्या सिनेमाने 15.25 कोटींची कमाई केली आहे. राम सेतूने अक्षयचा सिनेमा बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधनचा रेकॉर्डही मोडला आहे. अक्षयच्या या तीनही सिनेमांची कमाई 13 कोटींच्या वर जाऊ शकलेली नव्हती. अक्षयसाठी सिनेमाची ही आकडेवारी चांगली आहे. या सिनेमाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत होता, कमाईच्या बाबतीत हा सिनेमा पुढे आहे. ट्रेड पंडितांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, हा सिनेमा दिवाळीत रिलीज झाला आहे आणि तो एक लाँग वीकेंड आहे. त्यामुळे मंगळवारीही सिनेमाने चांगले कलेक्शन केले असेल अशी अपेक्षा आहे. 

सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया

अक्षय कुमारचा 'राम सेतू' सिनेमा रिलीज होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सोशल मीडियावर या सिनेमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी या सिनेमाला पाचपैकी चार स्टार दिले आहेत. एका यूजरने लिहिले की, "अक्षय कुमारचा हा सिनेमा साहस, भावना, संघर्ष, अॅक्शन, व्हीएफएक्सवर आहे." तर दुसऱ्याने म्हटले आहे, "रामसेतू हा अक्षय कुमारचा अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे... क्लायमॅक्सला सलाम... उत्कृष्ट दिग्दर्शन.." यूजरने लिहिले आहे, "राम सेतूसाठी शुभेच्छा", तिसऱ्या यूजरने "इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट राम सेतू" असं सिनेमाचं वर्णन केलं आहे. 

अधिक वाचा : पुलकित सम्राटच्या प्रेयसीचं फोटोशूट पाहून सगळेचं चक्रावले

रामायणानुसार, 'राम सेतू' श्रीलंकेला जाण्यासाठी श्रीरामाच्या सैन्याने बांधला होता आणि 'राम सेतू' सिनेमाची कथा एका पुरातत्वशास्त्रज्ञाची आहे.या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे राम सेतू पाडण्याची मागणी केली आहे, त्यानंतरच पुरातत्वशास्त्रज्ञाला राम सेतू आहे की नाही यावर संशोधन करण्यासाठी पाठवले जाते. आता या सिनेमातून इतिहासातील कोणत्या गोष्टींशी छेडछाड करण्यात आली आहे हे सिनेमा पाहिल्यनंतरच कळेल. या सिनेमात अक्षय कुमार पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. अक्षय कुमारसह जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी