Alia Bhatt Ranbir Kapoor Weddiong: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता पती-पत्नी आहेत. गुरुवारी रणबीर कपूरच्या घरी म्हणजेच वास्तू अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोन्ही स्टार्सनी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. लग्नानंतर लगेचच बातमी आली की रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी रिसेप्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. नीतू कपूरनेही लग्नानंतर रिसेप्शन होणार नसल्याची पुष्टी केली होती. आता टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे की रणबीर आणि आलिया वास्तू अपार्टमेंटमधील त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 16 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरने त्यांच्या घरी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यात जवळचे मित्र आणि कपूर आणि भट्ट कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील. या पार्टीसाठी आलिया-रणबीरने फिल्म इडस्ट्रीतल्या काही मित्रांनाही आमंत्रित केले आहे.
याआधी असे म्हटले जात होते की दोघेही कुलाब्यातील हॉटेल ताज आणि वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे रिसेप्शनचे आयोजन करतील परंतु असे काहीही झाले नाही.
साधारणपणे तुम्ही लग्नात वधू-वरांनी अग्नीभोवती सात फेरे घेतल्याचे ऐकले असेल, परंतु आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नाच्या दिवशी केवळ चार फेरे घेतले. बॉलीवूडमधील सर्वात गोंडस जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या डेब्यू चित्रपट ब्रह्मास्त्रच्या सेटवर प्रेमात पडले. तेव्हापासून ते अनेकदा एकत्र दिसले असून त्यांच्या केमिस्ट्रीने लाखो मने जिंकली आहेत.