Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding । मुंबई : बॉलिवूडचे क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज लग्नबंधनात अडकले आहे. दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे. या बहुचर्चित लग्नासाठी बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. अनेक दिवसांपासून या लग्नाची सर्वांनाच आतुरता होती तो क्षण अखेर आज आला. (Ranbir- Alia Wedding 'Made For Each Other' Alia-Ranbir stuck in marriage See photo).
लक्षणीय बाब म्हणजे मैत्रीपासून सुरू झालेले नातं आज विवाहाच्या बंधनात अडकले आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वीच या सेलिब्रिटींना आपल्या लग्नाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर एकाएकी लगबग, घाई गडबडीत लग्नाचे चित्र पाहायला मिळाले.
या बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याच्या लग्नासाठी दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये करण जोहर, करिना कपूर, भट्ट कुटुंबातील सदस्य, सैफ अली खान यांच्यासह काही दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच आलियाची आई, सोनी राजदान या सर्वांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे मेनू तयार केले गेले होते ज्यामध्ये जवळजवळ सर्व पदार्थांची व्यवस्था केली गेली. विशेष म्हणजे या मेनूमध्ये वर-रणबीर कपूर आणि वधू आलिया भट्ट तसेच पाहुण्यांच्या निवडीची काळजी घेण्यात आली होती.