Ranbir kapoor and Alia Bhatt : रणबीर आणि आलियाला होणार जुळी मुलं? रणबीर कपूरने केला मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Jul 18, 2022 | 00:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir kapoor and Alia Bhatt :रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी टाऊनमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. आलिया आणि रणबीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहेत, मात्र, सध्या रणबीर कपूरच्या एका उत्तराने त्यांच्या चाहत्यांनाही विचार करण्यात भाग पाडलं आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

Ranbir and Alia will have twins? Ranbir Kapoor made a big revelation
रणबीर-आलियाला होणार जुळी मुलं?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर-आलियाला होणार जुळी मुलं?
  • रणबीर कपूर शमशेराच्या प्रमोशनमध्ये व्यस्त
  • रणबीरच्या उत्तराने चाहत्यांनाही टाकलं कोड्यात

Ranbir kapoor and Alia Bhatt :रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी टाऊनमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. आलिया आणि रणबीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहेत, मात्र, सध्या रणबीर कपूरच्या एका उत्तराने त्यांच्या चाहत्यांनाही विचार करण्यात भाग पाडलं आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी टाऊनमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. आलिया आणि रणबीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहेत,  दोघेही पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार आहेत. आज 'ब्रह्मास्त्र'मधलं 'केसरिया' हे गाणंही रिलीज झालं आहे, जे चाहत्यांना खूप आवडतंय. दरम्यान, रणबीर कपूरची एक मुलाखतही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या बाळाबद्दल बोलत आहे.

आलिया भट्ट-रणबीर कपूर

रणबीर कपूर त्याच्या 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज होणार आहे. नुकताच रणबीर एक मुलाखत देत होता. यादरम्यान त्याने एक गेम खेळला ज्यामध्ये त्याला दोन सत्य आणि एक खोटे बोलायचे होते. अशा परिस्थितीत रणबीरच्या या उत्तराने चाहत्यांना बुचकळ्यात पाडलं. 

रणबीर कपूर


रणबीर म्हणाला, 'मला जुळी मुले आहेत, मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे आणि मी कामातून बराच ब्रेक घेत आहे.' आता रणबीरच्या या उत्तराने चाहते गृहीत धरत आहेत की कामातून ब्रेक घेणे खोटे आहे आणि अभिनेता जुळ्या मुलांचा बाप होणार आहे. एका चाहत्याने कमेंट करत 'लाँग ब्रेक खोटं आहे' असं लिहिलं, तर दुसऱ्याने लिहिलं, 'अरे देवा, जुळी मुलं आहेत.'

Ranbir Kapoor-Alia Bhatt Shaadi: Astrologers PREDICT Date, Compatibility, Babies - Exclusive Video Interview! | Hindi Movie News - Times of India

आलिया भट्ट अलीकडेच तिच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून परतली आहे. त्याचवेळी रणबीर 'शमशेरा' रिलीज होण्याची वाट पाहत आहे. यानंतर दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी