Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूरने केली घोषणा! आलिया भट्ट लवकरच होणार मिसेस कपूर 

Ranbir Kapoor on Marrying Alia Bhatt । बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर मागील मोठ्या कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. मात्र आता खुद्द रणबीरने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे.

Ranbir Kapoor announces Alia Bhatt will be Mrs. Kapoor soon
आलिया भट्ट लवकरच होणार मिसेस कपूर - रणबीर कपूर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागील मोठ्या कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
  • लवकरच आम्ही लग्न करणार आहोत असे रणबीरने म्हटले.
  • एप्रिलमध्ये हे कपल विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

Ranbir Kapoor on Marrying Alia Bhatt । मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर मागील मोठ्या कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. मात्र आता खुद्द रणबीरने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे. रणबीरने अलीकडेच म्हटले की, तो आणि आलिया लवकरच लग्न करणार आहे, मात्र त्याने लग्नाच्या तारखेबाबत काही माहिती दिली नाही. (Ranbir Kapoor announces Alia Bhatt will be Mrs. Kapoor soon). 

अधिक वाचा : रिकामी प्लास्टिकची बॉटल द्या आणि करा मोफत प्रवास

रणबीरने केली घोषणा

दरम्यान, रणबीरचे पिता दिवंगत ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्मा जी नमकीन' लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याच्या बाबतीत रणबीरने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला की तो आलिया भट्ट सोबत कधी लग्न करणार आहे. एनडीटीव्हीशी संवाद साधताना रणबीरने म्हटले की, "मी माध्यमांशी बोलताना कोणतीही तारीख सांगणार नाही. मात्र माझा आणि आलियाचा लवकरच लग्न करण्याचा मानस आहे, तर होय, आशा आहे की लवकरच आमचे लग्न होईल." लक्षणीय बाब म्हणजे या जोडी बाबत असे बोलले जात आहे की ते एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. 

अधिक वाचा : या १० गोष्टींच्या कॉम्बिनेशनने शरीरातील चरबी करा नष्ट

काकू रीमा जैन यांनी म्हटले...

पिंकविलाशी संवाद साधताना रणबीर कपूरची काकू रीमा जैन यांनी रणबीरच्या लग्नाबाबत भाष्य केले होते. रीमा यांनी म्हटले होते की, "मला अद्याप याबाबत काहीच माहिती नाही. ते दोघे लग्न करतील पण, केव्हा ते माहित नाही. हे सगळं काही ते दोघेच ठरवतील आणि अचानक आपल्या सगळ्यांना सर्व गोष्टींची माहिती मिळेल." रीमा जैन यांना विचारले गेले की, दोघेही एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकतील? यावर त्यांनी म्हटले, असे काही नाही. आम्ही अद्याप काहीच तयारी केली नाही त्यामुळे एवढ्या लवकर कसे होईल. जर हे खरे झाले तर माझ्यासाठी खूप धक्कादायक असेल." लक्षणीय बाब म्हणजे या कपलने अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

या चित्रपटात करणार एकत्र काम

वर्कफ्रंटबाबत भाष्य करायचे झाले तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही ब्रम्हास्त्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचा पहिला भाग ४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटात रणबीर शिवा आणि आलिया भट्ट ईशाची भूमिका साकारत आहे. याशिवाय रणबीर कपूर शमशेरा आणि ॲनिमल या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट करण जोहरचा चित्रपट रॉकी रानी की लव्ह स्टोरी आणि नेटफ्लिक्सच्या इंटरनॅशनल वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी