Bollywood News : 'हा' अभिनेता आलिया भट्टवर बॉडी शेमिंग केल्यामुळे ट्रोल, आता मागितली माफी

बी टाऊन
Updated Aug 24, 2022 | 21:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir Kapoor Apologizes After Body Shaming Alia Bhatt: काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) लाइव्ह सेशनमध्ये पत्नी आलिया भट्टला (Alia Bhatt)बॉडी-शेम केले होते. त्यामुळे तो ट्रोल झाला, आता अभिनेत्याने मीडियाशी बोलताना माफी मागितली आहे.

Ranbir Kapoor apologizes after body shaming wife alia Bhatt
आलिया भट्टवर बॉडी शेमिंगमुळे 'हा' अभिनेता ट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूरने पत्नी आलिया भट्टला बॉडी शेम केले.
  • आलिया भट्टला बॉडी शेम केल्यामुळे रणबीर कपूर ट्रोल
  • ट्रोल झाल्यानंतर रणबीर कपूरने माफी मागितली आहे.

Ranbir Kapoor Apologizes After Body Shaming Alia Bhatt: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या लाइव्ह सेशनमध्ये पत्नी आलिया भट्टला (Alia bhatt) बॉडी शेम केल्यामुळे चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने लाइव्ह सेशनमध्ये पत्नीला 'फेलोड' म्हटले होते. आलिया भट्टचा बेबी बंप पाहून रणबीर कपूरने असे म्हटले होते. पण लोकांना ते अजिबात आवडले नाही आणि त्यांनी रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या अभिनेत्याला सोशल मीडिया ( Social media ) वापरकर्त्यांनी जोरदार फटकारले. ( Ranbir kapoor apologizes after body shaming wife alia bhatt )

बुधवारी, एसएस राजामौली आणि नागार्जुनसह कलाकार चेन्नईमध्ये त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे प्रमोशन करत होते. यादरम्यान जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की, आलिया भट्टला 'फेल्लोड' म्हणण्यावर काही बोलायचे आहे का?त्यावर रणबीरने सांगितले की हा एक विनोद होता. यासोबतच त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच खराब असल्याचेही त्याने सांगितले. यावर बोलताना अभिनेता म्हणाला, 'मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. मी एक विनोद केला होता. मी हे जाणूनबुजून केलेले नाही.पण आता मला खरोखर माफी मागायची आहे."

अधिक वाचा : हृतिक-सैफच्या बहुप्रतीक्षित सिनेमाचा Teaser out

यावर रणबीर म्हणाला, 'म्हणूनच ज्या लोकांना वाईट वाटले त्यांची मी माफी मागू इच्छितो. मी आलियाशी बोललो आणि ती हसायला लागली आणि तिला काही हरकत नव्हती. पण माझी विनोदबुद्धी खूप वाईट आहे आणि कधीकधी मला त्याचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो.

रणबीर-आलियाचे एप्रिलमध्ये लग्न झाले 

रणबीर कपूर स्पष्टीकरण देताना म्हणतो, 'पण माझी विनोदबुद्धी खूप वाईट आहे. त्यामुळे जर मी कोणाला दुखावले असेल तर मला खरोखर लाज वाटते.'आलिया आणि रणबीर त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास तयार आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे लग्न झाले.

अधिक वाचा :  साऊथस्टार विजय देवरकोंडाची जादू चालणार?

9 सप्टेंबरला रिलीज होणार ब्रह्मास्त्र

'ब्रह्मास्त्र'मध्ये पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी