रणबीर कपूर करतोय साइड बिजनेसचा प्लान, आलिया करणार मदत

बी टाऊन
Updated May 07, 2019 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir alia: रणबीर कपूर लवकरच आलिया भट्टसोबत पहिल्यांदा स्क्रिनवर एकत्र दिसणार आहे. दोघंही एकत्र ब्रम्हास्त्रमध्ये दिसतील. हा सिनेमा सुपरनॅच्युरल पावरवर आधारित आहे. आता रणबीर साईड बिजनेसचा विचार करत आहे.

Ranbir and alia
रणबीर कपूर करतोय साइड बिजनेसचा प्लान, आलिया करणार मदत  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: रणबीर कपूर सध्या आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यामध्येच आता रणबीर कपूर लवकरच साईड बिजनेस सुरू करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत बॉलिवूड सेलेब्स अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, मलायका अरोरा, कृति सेनन आपल्या स्वतःच्या क्लोदिंग लाइन लॉन्च करण्यासोबतच ऑनलाइन क्लोदिंग स्टोरशी देखील जोडले गेले आहेत. याआधीच आलिया भट्टनं आपला क्लोदिंग लाइन स्टाइलक्रेकर लॉन्च केला आहे. आता रणबीर कपूर देखील याचाच एक भाग बनणार आहे. 

रणबीर कपूर आता आपला क्लोदिंग लाइन लॉन्च करण्याचा प्लानिंग करत आहे. मुंबई मिररच्या रिपोर्ट्सनुसार, आपल्या फॅशन सेंससाठी ओळखणारा रणबीर कपूर आता या बिजनेसमध्ये पैसे इनवेस्ट करण्याचा विचार करत आहे. सध्या तरी रणबीरच्या क्लोदिंग लाइनचं नाव निश्चित झालं नाही आहे. दरम्यान २०२० पर्यंत रणबीर क्लोदिंग लाइन लॉन्च करण्याचा विचार करतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Ranbir Kapoor poses for Renault's #BeTheTribe campaign. #RenaultTRIBER. #RanbirKapoor #Ranbir #Bollywood A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

रणबीर कपूर लवकरच आलिया भट्टसोबत पहिल्यांदा बिग स्क्रिनवर एकत्र दिसणार आहे. दोघंही अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रम्हास्त्रमध्ये काम करत आहेत. या सिनेमाची शूटिंग गेल्या वर्षी सुरू केली होती. या सिनेमासाठी दर्शकांना खूप उत्साह आहे. रणबीरचा हा सिनेमा ब्रम्हास्त्र सुपरनॅच्युरल पावरवर आधारित आहे. हा सिनेमा अयान मुखर्जी डायरेक्ट करत आहेत. सिनेमात वीएफएक्सचा भरपूर वापर करण्यात आला आहे. अयान नेहमी या सिनेमाशी संबंधित बरेच फोटो शेअर करत असतो. हा सिनेमा याच वर्षी रिलीज होणार होता. मात्र आता रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आता २०२० मध्ये रिलीज होईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
#RanbirKapoor #Ranbir #Bollywood A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

ब्रम्हास्त्र सिनेमाच्या निमित्तानं आलिया आणि रणबीर यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर झळकणार आहे.  आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत काम करण्यासाठी तळमळत होती असं सांगितलं. आलिया सुद्धा आपला हा सिनेमा रिलीज होण्याची वाट बघत आहे. आलियानं ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर सोबत काम करून तिला कसं वाटलं हे सांगितलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
[More Pictures] Ranbir Kapoor and Alia Bhatt at #UmangPoliceShow2019 #RanbirKapoor #Ranbir #AliaBhatt #Bollywood A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियानं सांगितलं की, एक अभिनेत्री म्हणून मी रणबीरवर नेहमीच प्रेम केलं आहे. ते मोठ्या पडद्यावर खूप शानदार काम करतात, पावरफुल असून सुद्धा ते प्रामाणिक आणि परिपूर्ण आहेत. मी त्यांच्यासोबत काम करताना मला जाणवलं की त्यांचं काम खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. मी अजूनही त्यांच्याकडून शिकतेय आणि पुढंही शिकत राहीन.

आलिया सांगते की, ब्रह्मास्त्र माझ्यासाठी एक चित्रपट नाही तर एक मोठा अनुभव आहे. रणबीर सोबत काम करून मी खूप आनंदी आहे. पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र काम करत आहोत, ते ही या चित्रपटात. एक काळ होता जेव्हा मी विचार करायची की आम्ही दोघं केव्हा एकत्र काम करू? तेव्हा काय होईल? आणि आता हे सगळं खरं होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी