Ranbir Alia marriage : आकाश अंबानीला रणबीर कपूरने दिले खास आमंत्रण, लग्नासाठी रद्द केली इंटरनॅशनल ट्रीप

बी टाऊन
Updated Apr 14, 2022 | 22:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akash Ambani in Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनीही हजेरी लावली होती. आकाश अंबानीने आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी आंतरराष्ट्रीय ट्रीपही रद्द केली आहे.

Ranbir Kapoor gives special invitation to Akash Ambani, cancels international trip for wedding
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे शुभमंगल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आकाश अंबानीने आपला खास मित्र रणबीर कपूरच्या लग्नात हजेरी लावली.
  • रणबीरच्या लग्नासाठी आकाश अंबानीने इंटरनॅशनल ट्रीप रद्द केली.
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला फक्त खास पाहुणेच हजर होते.

Akash Ambani in Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह पंजाबी रितीरिवाजांनी संपन्न झाला. 
लग्नात अनेक बड्या व्यक्ती पाहुणे म्हणून पोहोचल्या होत्या. या पाहुण्यांमध्ये आकाश अंबानी हा असा पाहुणा आहे, ज्याला रणबीर कपूरने वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते. एवढेच नाही तर रणबीर कपूरच्या लग्नामुळे आकाश अंबानीने त्याचा महत्त्वाचा प्लॅनही रद्द केला होता. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने आकाश अंबानीला लग्नासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते. आकाश अंबानीने तर त्याच्या खास मित्राच्या लग्नासाठी आपली आंतरराष्ट्रीय ट्रीप रद्द केली. 2019 मध्ये रणबीर कपूरनेही आकाश अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली होती. आकाश पत्नी श्लोका मेहतासोबत लग्नाला पोहोचला होता. आकाशने त्याच्या खास मित्राच्या लग्नात बेबी पिंक कलरची शेरवानी घातली होती. त्याचवेळी श्लोका मेहता गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. गुलाबी लिप शेड आणि मांग टिकासह श्लोकाने तिचा लूक पूर्ण केला.


रणबीर-आलियाचं लग्न संपन्न


रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नाची थीम पेस्टल होती. त्याचवेळी जवळचे मित्र पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या आउटफिटमध्ये पोहोचले होते. रणबीर आणि आलियाने पंजाबी रितीरिवाजातून सात फेरे घेतले आहेत. नीतू कपूर, सोनी राजदान, शाहीन भट्ट, रिद्धिमा कपूर सहानी, करीना कपूर खान, रीमा जैन, रणधीर कपूर, राहुल भट्ट आणि करण जोहर गुलाबी रंगाच्या पोशाखात लग्नात दिसले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

असा होता आई नीतू कपूरचा लूक

नीतू कपूर आपल्या मुलाच्या लग्नात खूपच सुंदर दिसत होती. या खास दिवसासाठी तिने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा निवडला. नीतूने हा लेहेंगा साडी स्टाइलमध्ये परिधान केला होता. यासोबत तिने जड दागिने घातले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)


रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर सहानीबद्दल सांगायचे तर तिने गोल्डन कलरचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूप क्लासी दिसत होती. नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी आणि समायरा कपूर यांनी फोटोग्राफर्ससमोर पोज दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी