Ranbir kapoor and Aaliya bhat : रणबीर कपूरने केला आलियाचा अपमान, रणबीरचे हे शब्द ऐकून आलियाला रडू आले

Ranbir kapoor and Aaliya bhat : रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि निर्माते त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या मोशन पोस्टरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये पाहुया.

Ranbir Kapoor insulted Alia bhat
रणबीर कपूरने केला आलियाचा अपमान !  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूरने आलिया भट्टचा अपमान केला.
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
  • रणबीर आणि आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात

Ranbir kapoor and Aaliya bhat update : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि सर्व चित्रपट निर्माते त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या मोशन पोस्टरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या प्रमोशनल इव्हेंटमध्ये मेकर्स लोकांशी बोलतानाही दिसले. त्याचवेळी, अभिनेता रणबीर कपूर आणि लोकांमधील संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, प्रेक्षकांनीही या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. 

Brahmastra': Fans are unimpressed with Ranbir Kapoor and Alia Bhatt's on-stage chemistry, say 'so much awkwardness' | Hindi Movie News - Times of India

आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' च्या मोशन पोस्टरच्या रिलीजसाठी एका प्रमोशनल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे निर्माते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उपस्थित मेकर्स आणि स्टारकास्टशी समोरासमोर बोलत होते. या शोचे अनेक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता रणबीर कपूर त्याच्या चाहत्यांशी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टसाठी फटाका हा शब्द वापरला आहे. रणबीरला हे बोलताना पाहून त्याचे चाहते हसू लागले. पण शेजारी बसलेल्या आलिया भट्टला ही गोष्ट अजिबात आवडत नाही.


रणबीर म्हणाला की, आलिया अगदी फटाक्यासारखी आहे. आलिया पर्यावरणपूरक फटाका आहे, ती चक्री आहे, ती लक्ष्मी बॉम्ब आहे, ती अनार आहे, ती सर्वकाही आहे. अभिनेता रणबीर कपूरची ही गोष्ट आलियाला अजिबात आवडली नाही. तिचा चेहरा बघून अंदाज लावता येतो की, अभिनेत्याचे म्हणणे ऐकून आलिया त्याच्यावर किती चिडली असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, ही गोष्ट एवढ्यापुरती मर्यादित नसून, कार्यक्रमातून परत जात असताना आलिया आणि रणबीरमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी रणबीर त्याची गर्लफ्रेंड आलियाला पुढच्या वेळी असे करणार नाही, असे समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण आलिया त्याचे ऐकत नाही. ती फक्त रणबीरला असं पुन्हा बोलू नकोस इतकच सांगते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी