Star Cast fees: 'ब्रह्मास्त्र'साठी रणबीर कपूरने घेतले 30 कोटी, आलिया-अमिताभसह या कलाकारांनीही घेतली इतकी फी

बी टाऊन
Updated Apr 22, 2022 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

StarCast fees:अलीकडेच मियाँ बीवी बनलेले रणबीर आणि आलिया लवकरच त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत. सुमारे 300 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटात रणबीर आणि आलियाशिवाय इतरही अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. चित्रपटाच्या इतर कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकेत आहेत.

Ranbir Kapoor paid Rs 30 crore for 'Brahmastra', Alia-Amitabh and other actors.
'ब्रह्मास्त्र'च्या स्टारकास्टने घेतली कोट्यवधींची फीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूरने ब्रह्मास्त्र सिनेमासाठी 30 कोटी रुपये घेतले
  • आलिया भट्टने ब्रह्मास्त्रसाठी आकारले 10 ते 12 मानधन
  • बिग बी अमिताभ बच्चन यांनी 8 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जात आहे.

Star Cast fees: बह्मास्त्र हा मोस्ट अवेटेड चित्रपट 2022 मधील सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. सुपरहिरोच्या संकल्पनेवर बनलेला हा चित्रपट दोन भागात रिलीज होणार आहे. हा चित्रपट बनवायला तब्बल चार वर्षे लागली, साहजिकच यात काम करणाऱ्या कलाकारांनीही या चित्रपटासाठी बराच वेळ दिला आहे. हा चित्रपट करण्यासाठी सर्व कलाकारांनी मोठी रक्कम घेतली आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी एकट्या रणबीरने 25 ते 30 कोटी रुपये घेतले आहेत.

हा चित्रपट करण्यासाठी इतर कलाकारांनी किती पैसे घेतले ते जाणून घेऊया

 
रणबीर कपूर -आलिया भट्ट

Ayan Mukerji confirms Alia Bhatt and Ranbir Kapoor's wedding with 'Kesariya'  song video from 'Brahmastra' | Hindi Movie News - Times of India
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने हा चित्रपट करण्यासाठी सुमारे 25 ते 30 कोटी रुपये आकारले आहेत, तर अलीकडेच त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट हिने 10 ते 12 कोटी रुपये आकारले आहेत. चित्रपटात रणबीरच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव शिव आहे, तर आलिया भट्ट ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.


अमिताभ बच्चन 

Amitabh Bachchan terminates ad contract with tobacco brand - The Economic  Times

या मल्टीस्टारर चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका आहे. भगवान ब्रह्मदेवाची भूमिका साकारणाऱ्या बिग बींनी हा सिनेमा करण्यासाठी सुमारे ८ कोटी रुपये घेतले आहेत.

मौनी रॉय

HOT! You can't miss Mouni Roy's desi style - Times of India
स्मॉल स्क्रीनमधून घरोघरी प्रसिद्ध झालेल्या मौनी रॉयने हा चित्रपट करण्यासाठी चांगली रक्कमही घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉयने जवळपास 3 कोटी रुपये चार्ज केले आहेत. मौनीने या चित्रपटात लेडी व्हिलनची भूमिका साकारली आहे.


नागार्जुन

Despite being such a legend, Lata ji was such a simple person: Akkineni  Nagarjuna | Telugu Movie News - Times of India

साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अनेक वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. नागार्जुन शेवटचा एलओसी कारगिल या चित्रपटात दिसला होता. 
या चित्रपटासाठी नागार्जुनने 10 ते 12 कोटी इतकी मोठी रक्कम घेतली आहे. या चित्रपटात तो पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात काम करण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की मी नेहमीच हिंदू पौराणिक कथांनी प्रभावित आहे. त्यांनी सांगितले की रामायण आणि महाभारत सारख्या ग्रंथांचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे, त्यामुळेच ते या चित्रपटाशी जोडले गेले.


डिंपल कपाड़िया

B-town celebs congratulate Dimple Kapadia on being roped in for Christopher  Nolan's 'Tenet' | Hindi Movie News - Times of India

या चित्रपटात ज्येष्ठ कलाकार डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटात काम करण्यासाठी 1 ते 2 कोटी रुपये शुल्क आकारले आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी