Brahmastra: रणबीर कपूरने मंदिरात घातलेले बूट? चाहत्यांच्या नाराजीनंतर अयान मुखर्जीने स्पष्टीकरण दिले

बी टाऊन
Updated Jun 20, 2022 | 14:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Brahmastra: ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.यातील एका दृश्यात रणबीर कपूरने मंदिरात शूज घातलेले दिसत आहे, ज्यावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. यावर आता दिग्दर्शक अयान मुखर्जीने स्पष्टीकरण दिले आहे.

Ranbir seen wearing shoes in the temple, Ayan Mukherjee's explanation
रणबीर कपूरने मंदिरात नव्हे तर मंडपात घातले होते शूज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर १५ जून रोजी रिलीज झाला.
  • ट्रेलरमध्ये रणबीर कपूर मंदिरात शूज घालून उभा असलेला दिसत आहे.
  • सिनेमातल्याया सीनवर दिग्दर्शक अयान मुखर्जीने स्पष्टीकरण दिले आहे.

Brahmastra: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ब्रह्मास्त्र रिलीजसाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून तो लाखो लोकांनी पाहिला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल,असे चाहत्यांचे म्हणणे आहे. पण या सगळ्यात अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेपही घेतला.

अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

चित्रपटाच्या ट्रेलरच्या एका दृश्यात रणबीर कपूर मंदिराच्या आत शूज घातलेला दिसत आहे, ज्यावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने इंस्टाग्राम अकाउंटवरून स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले की, 'काही लोक  जे ट्रेलरमधील एका दृश्यामुळे संतापले होते.ज्या दृश्यात रणबीर कपूर मंदिरातील घंटा वाजवताना शूज घातलेला दिसत आहे. चित्रपटाचा निर्माता (आणि एक भक्त) या नात्याने, मला नम्रपणे या दृश्यात काय घडले ते स्पष्ट करायचे होते. आमच्या चित्रपटात रणबीर मंदिरात जात नसून तो एका दुर्गापूजा मंडपात जात आहे.


अयानने चाहत्यांना ही गोष्ट सांगितली

या स्पष्टीकरणात अयान मुखर्जीने पुढे लिहिले की, 'माझे स्वतःचे कुटुंब 75 वर्षांपासून अशाच दुर्गा पूजा उत्सवाचे आयोजन करत आहे. ज्याचा मी लहानपणापासून एक भाग आहे. माझ्या अनुभवानुसार, आम्ही देवीच्या स्टेजच्या आधी शूज काढतो, मंडपात प्रवेश करताना नाही. असे सांगत अयानने लिहिले,“या दृश्यामुळे व्यथित झालेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण ब्रह्मास्त्र भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा आदर करणारा एक फिल्मी अनुभव म्हणून तयार करण्यात आला आहे. म्हणूनच मी हा चित्रपट बनवला आहे, त्यामुळे ही भावना ब्रह्मास्त्र पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.


या दिवशी रिलीज होणार सिनेमा


चित्रपटाबद्दल बोलायचे तर, त्याचे शूटिंग सुमारे 5 वर्षांपूर्वी सुरू झाले होते, जो यावर्षी 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी