Shamshera Movie Audience Reaction: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor), चित्रपट शमशेरा शुक्रवार 22 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रणबीर कपूर चार वर्षांनंतर शमशेरामधून पुनरागमन करत आहे. रणबीर कपूर या आधी 2018 मध्ये आलेल्या संजू चित्रपटात दिसला होता. रणबीरच्या पुनरागमनाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. (Ranbir kapoor starrer Shamshera movie got mix recponce from the audience)
रणबीर कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या पुनरागमनामुळे रणबीर कपूरचे चाहते खूप खूश आहेत. त्याचबरोबर काहीजण या चित्रपटाला ट्रोल देखील करत आहेत. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, 'शमशेरा हा या वर्षातील सर्वात वाईट चित्रपट आहे. इंटरव्हलमध्येच थिएटर सोडावसं वाटतंय. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'शमशेरा चित्रपट रणबीर कपूरच्या खांद्यावर आहे. रणबीरने ते खूप छान हाताळले आहे. शमशेरामध्ये रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) वाणी कपूर (Vaani Kapoor) आहे. याशिवाय संजय दत्त (Sanjay Dutt) या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.
अधिक वाचा : पॅरोलवर सुटलेल्या बाबाची कहाणी
शमशेराचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन
शमशेरा या चित्रपटाकडून अपेक्षा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करेल (Shamera box office collection ) मात्र पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून तसे दिसत नसले तरी येत्या काही दिवसांत कलेक्शन कमी-जास्त होऊ शकते. फिल्मबीटच्या रिपोर्टनुसार, शमशेराच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 9-11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच वेळी, बॉक्स ऑफिस इंडियाने पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे 10 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे.
शमशेरामध्ये रणबीर कपूरसोबत संजय दत्त आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.चित्रपटातील रणबीरच्या पात्राचे नाव शमशेरा आहे. त्याचवेळी, संजय दत्तच्या पात्राचे नाव दरोगा शुद्ध सिंह आहे. याशिवाय या चित्रपटात वाणी कपूर डान्सर सोनाच्या भूमिकेत दिसणार आहे, जी रणबीरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु भाषेतही रिलीज झालाआहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करत आहे.
अधिक वाचा : ऑफिसमध्ये काम करताना लोक काय काय पाहतात?
रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट रिलीज झाला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत वाणी कपूर आणि संजय दत्त दिसत आहेत. आगामी सिनेमात तो श्रद्धा कपूरसोबत लव रंजनच्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. एनिमल या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत देखील दिसणार आहे. या सर्व चित्रपटांव्यतिरिक्त, रणबीर कपूरचे चाहते ब्रह्मास्त्रसाठी सर्वात जास्त उत्सुक आहेत, ज्यामध्ये तो पहिल्यांदाच आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.