Ranbir Alia marriage : रणबीर कपूर आलिया भट्टला देणार हिरेजडीत वेडिंग बँड, लंडनच्या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडकडून गिफ्ट खरेदी

बी टाऊन
Updated Apr 14, 2022 | 00:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir kapoor 8 diamond wedding gift: रणबीर कपूरच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, लग्नाच्या दिवशी रणबीर आलियाला एक कस्टम मेड वेडिंग बँड देणार आहे, ज्यावर 8 हिरे आहेत. असेही म्हटले जात आहे, हा बँड क्लीन अँड कार्पल्स ऑफ लंडन नावाच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडने तयार केलेला आहे.

Ranbir Kapoor to give Alia Bhatt a wedding band of 8 Diamonds, buy gifts from a famous jewelery brand in London
आलियासाठी रणबीरचा कस्टम मेड वेडिंग बँड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर आणि आलियाच्या प्री वेडिंग फंक्शनला आजपासून सुरुवात झाली आहे.
  • आलियाला लग्नाच्या दिवशी रणबीर खूप मौल्यवान गिफ्ट देणार आहे.
  • आलियासाठी रणबीरने स्वतः डायमंड पंसत केले आहेत.

Alia bhatt gets Gift From Ranbir kapoor: अनेक अफवा आणि अनुमानानंतर आता अखेर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपल आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून या जोडप्याच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. काही वेळापूर्वी महेश भट्ट आणि पूजा भट्टच्या फोटोंनी पुष्टी केली की आलियाने रणबीरच्या नावाची मेहंदीने हातावर काढलेली आहे. वृत्तानुसार, रणबीर आपल्या लेडीलव्हला लग्नासाठी खूप मौल्यवान भेटवस्तू देणार आहे.

रणबीरच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, लग्नाच्या दिवशी रणबीर आलियाला 8 हिरे असलेला कस्टम मेड वेडिंग बँड देणार आहे. असेही म्हटले जात आहे की,  हा बँड लंडनमधील Clef & Arpels नावाच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडमधून बनवण्यात आला आहे. या बँडसाठी रणबीरने स्वतः डायमंड पसंत केले आहेत. या ब्रँडचे वैशिष्ट्य म्हणजे ते हिऱ्याला अतिशय सुंदरपणे बोल्ड लूक देते.

मेहंदी फंक्शन संपले, संगीत सोहळा सुरू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीरचा मेहंदी आणि संगीत सेरेमनी आज ठेवण्यात आली आहे. सूत्रांचे मानायचे झाले तर, आलियाने रणबीरच्या नावाची मेहेंदी हातावर काढली आहे. येणाऱ्या पाहुण्यांकजून कप्लसना भेटवस्तूही दिल्या जात आहेत.सुरतच्या ज्वेलर्सने लव्हबर्डसाठी सोन्याचा मुलामा असलेला पुष्पगुच्छ पाठवला आहे, या पुष्पगुच्छाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी