Ranbir Alia marriage : कपूर कुटुंबाच्या लाडक्या रणबीरच्या लग्नाचा मेनू आहे खास, पाहुण्यासाठी खास या पदार्थांची मेजवानी

बी टाऊन
Updated Apr 14, 2022 | 01:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir Alia marriage : खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या कपूर घराण्याचा लाडका रणबीर कपूरच्या लग्नाचा मेनू खूपच खास आहे. या मेनूमध्ये देश-विदेशातील सर्व पदार्थांकडे लक्ष देण्यात आले आहे.

 Ranbir Kapoor's wedding menu is special, special feast for the guests
रणबीर-आलियाच्या लग्नाचा खास मेनू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर आलियाच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला आहे
  • ग्रॅण्ड वेडिंगचा मेनू खूप खास आहे
  • प्रत्येक विधीत वेगवेगळे पदार्थ दिले जातील

Ranbir Alia marriage menu : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मोस्ट अवेटेड ग्रँड वेडिंगचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. कपूर कुटुंबाला गेटटूगेदर आणि खाणे खूप आवडते. अशा परिस्थितीत ग्रँड वेडिंगमध्ये या दोन्ही गोष्टींवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रणबीर-आलियाच्या लग्नाचा मेनू खूपच अप्रतिम असून त्यात एकाहून एक उत्तम पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

पहिल्या दिवसाचा मेनू 

गणेशपूजनाने लग्न विधी सुरू झाले. अशा परिस्थितीत पूजेदरम्यान शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये माटुंग्याच्या मुथुस्वामी कॅटरर्सची खास व्यवस्था करण्यात आली होती. ते दक्षिण भारतीय पदार्थांसाठी ओळखले जातात. इडली, डोसा, मेदुवडा यासोबतच चाट-पापडी, दही-भला हे पदार्थ मेनूमध्ये होते. इतकेच नाही तर इतरही अनेक अप्रतिम पदार्थ मेनूमध्ये ठेवण्यात आले होते. मिठाईसोबत लस्सीही असल्याचं सांगण्यात आलं. 


प्रत्येक दिवसाचा मेनू वेगळा असेल

लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे मेनू तयार केले गेले आहेत ज्यामध्ये जवळजवळ सर्व पदार्थांची व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे या मेनूमध्ये वर -रणबीर कपूर आणि वधू आलिया भट्ट तसेच पाहुण्यांच्या निवडीची काळजी घेण्यात आली आहे.

फोन कॅमेरावर स्टिकर्स

गोपनीयता राखण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, काही निवडक पाहुण्यांच्या याद्या आहेत ज्यांना कार्यक्रमांमध्ये सामील केले जाईल परंतु त्यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा फोन कॅमेरा बंद केला जाईल. लग्नसमारंभात पाहुण्यांच्या कॅमेऱ्यांवर स्टिकर्स लावले जातील जेणेकरुन ते कोणत्याही प्रकारे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढू शकत नाहीत. सिक्युरिटी युनिटजवळ स्टिकर्सचे रोल्स देण्यात आले असून आता सर्व पाहुण्यांचे मोबाईल कॅमेरे कव्हर केले जातील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी