Ranvir Singh on movies bold scene : नवी दिल्ली: दीपिका पदुकोणचा ( Deepika padukone )'गहराइयां' हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant chaturvedi ), अनन्या पांडे ( Ananya pandey) आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत. 'गहराइयां'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना कळले आहे की, यात बरेच बोल्ड सीन्स पाहायला मिळणार आहेत. विशेषतः दीपिका आणि सिद्धांत यांच्यातील लव्ह मेकिंग सीनची बरीच चर्चा आहे. अशा परिस्थितीत आता रणवीर सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करून आपले मत व्यक्त केले आहे.
सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्याने तो चर्चेत आला आहे. यावर अनेक बॉलीवूड स्टार्सनी प्रतिक्रिया व्यक्त करत याचं वर्णन चमकदार असं केलं आहे. ट्रेलरवर पोस्ट करणाऱ्या कलाकारांमध्ये आलिया भट्ट, झोया अख्तर, चंकी पांडे (Chanki Pandey ) आणि शनाया कपूर यांचा समावेश आहे. त्याचवेळी रणवीर सिंगने ( Ranveer singh) त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.रणवीर सिंगने ( Ranveer singh) त्याच्या सोशल मीडिया पेजवर चित्रपटातील दीपिकाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले- 'मूडी, सेक्सी आणि इंटेन्स, मला साइन अप करा माझे सर्व आवडते आहेत सिनेमात, शकुन बत्रा, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा, नसीर द लिजेंड.'
दीपिकाला टॅग करत रणवीर लिहितो, 'आणि माझी मुलगी Fazillion buxxx सारखी दिसते.' पोस्टवर कमेंट करताना अनन्या पांडेने लिहिले- 'तू फेव्हरेट आहेस.' या पोस्टवर सिद्धांत चतुर्वेदी यांनी हार्ट इमोटिकॉन बनवला आहे. तर त्याचवेळी Amazon Prime Video ने देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, 'हम इस पोस्ट की गहराइ को समझ सकते हैं'
'गहराइयां' हा रिलेशनशीप ड्रामा आहे. ही कथा चार लोकांमधील गुंतागुंतीचे नाते आणि त्यांच्या अडचणींबद्दल आहे. चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण यांच्यात अनेक बोल्ड सीन्स आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे. यात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 11 फेब्रुवारीला Amazon Prime Video वर हा सिनेमा रिलीज होणार आहे.