Ranveer and Deepika : रणवीर सिंग-दीपिका पदुकोणने 119 कोटींचे अपार्टमेंट खरेदी केले, शाहरुख खान आणि सलमान खानचे झाले शेजारी

बी टाऊन
Updated Jul 11, 2022 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer Singh Deepika Padukone New Apartment Cost: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नव्या प्रॉपर्टीचे मालक बनले आहेत. या जोडप्याने मुंबईतील वांद्रे येथे सर्वात महागडे आणि आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.

Ranveer Singh-Deepika Padukone buy apartments worth Rs 119 crore, Shah Rukh Khan and Salman Khan become neighbors
रणवीर-दीपिकाचे आलिशान अपार्टमेंट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.
  • आता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे.
  • हे कपल सलमान खान आणि शाहरुख खानचे शेजारी बनले आहे.

Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. जेव्हाही या दोघांना पाहिले जाते तेव्हा ते नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूडची जोडपी आलिशान जीवन जगतात आणि अनेकदा त्यांची सुट्टी सुंदर ठिकाणी साजरी करताना दिसतात. आता अलीकडेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नवीन मालमत्तेचे मालक बनले आहेत. या जोडप्याने मुंबईतील वांद्रे येथे 'सागर रेशम' या निवासी टॉवरमध्ये एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.


या नवीन अपार्टमेंटमध्ये सुंदर समुद्र दिसत आहे. रिपोर्टनुसार, या जोडप्याने हे घर 119 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. देशातील इतर कोणत्याही अपार्टमेंटच्या तुलनेत हे घर सर्वात महाग आहे.

अधिक वाचा : पुरुषाला आली पाळी, वैद्यकीय चाचणीनंतर कळाली धक्कादायक माहिती

Ranveer Singh shared new look photos on instagram deepika padukone commented | रणवीर सिंह के सीरियस मैस्क्युलिन लुक पर फिदा हुईं दीपिका पादुकोण, किया रोमांटिक कमेंट | Hindi News ...

या मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत एक लाख रुपये असल्याची चर्चा आहे. अभिनेत्याने 'ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी' या फर्मद्वारे हे घर विकत घेतले आहे, एवढेच नाही तर दोघांनी यासाठी महसूल विभागाकडे 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

अधिक वाचा : केवळ दारू-सिगारेटच नाही तर या गोष्टींमुळं यकृत होत खराब


हा टॉवर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुख खानचा मन्नत बंगला यांच्यामध्ये आहे. टॉवरच्या 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर त्याचा क्वाड्रुप्लेक्स आहे. त्याचे एकूण चटईक्षेत्र 11,266 चौरस फूट आणि टेरेस 1,300 चौरस फूट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी