मुंबई : चित्रपटगृहे पूर्णपणे उघडल्यानंतर आता, अनेक मोठे सिनेमेसुद्धा धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अक्षय कुमारनंतर आता रणवीर सिंहचा प्रतिक्षित चित्रपट ‘83’च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. रणवीर सिंगचा हा सिनेमा 4 जून रोजी प्रदर्शीत होणार आहे.
रणवीर सिंहने सोशल मीडियात चित्रपटाचे पोस्टर व तारीख शेअर केली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच, तामिळ, तेलुगु, आणि मल्याळी या भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. ‘83’मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारित आहे.
‘83’ व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ‘झुंड’ या चित्रपट प्रदर्शनाची घोषणा करत तारीख सांगितली आहे. त्यासोबतच, आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांचा ‘चंडीगढ करे आशिकी’ हा 9 जुलैला प्रदर्शीत होणार आहे.
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ 28 मे 2021 रोजी प्रदर्शीत होणार आहे. यात वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता हे कलाकार आहेत. तर, अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ दिवाळीत 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शीत होणार आहे.
होळीपासून दिवाळीपर्यंत यशराज फिल्म्सचे एकूण पाच चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांची घोषणा झालेली आहे. 19 मार्च 2021 ला संदीप आणि पिंकी यांचा ‘फरार’ हा सिनेमा प्रदर्शीत होणार असून, दिवाकर बॅनर्जी यांनी हा दिग्दर्शीत केला आहे.
‘बंटी और बबली-2’ हा 23 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांचा ‘शमशेरा’ 25 जून 2021ला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शीत होणार आहे. रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’सुद्धा 27 ऑगस्ट 2021ला प्रदर्शित होणार आहे.