Ranveer and Deepika : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपिकाने रणवीरचा हात धरण्यास नकार दिला आणि दोघांचे एक्सप्रेशन बघून त्यांच्यात काहीतरी दुरावा निर्माण झाला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे की त्यांच्या लग्नात काही घडत नाही ना? दोघांमध्ये भांडणे होतात का? मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना मिळाली आहेत. अलीकडेच, आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी फ्लर्ट करत आहेत.
अधिक वाचा :रंगीबेरंगी साडीत प्राजक्ताचं फोटोशूट, चाहते म्हणाले खूपच क्यूट
या व्हायरल व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण तिच्या डेब्यू चित्रपट 'ओम शांती ओम' मधील प्रसिद्ध संवाद बोलताना दिसत आहे, ज्यावर रणवीर सिंह अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीही दिसत आहेत. हा व्हिडिओ एका स्पोर्ट्स इव्हेंटचा आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन देखील दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण तिच्या डेब्यू चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग बोलते, 'जर आपल्याला खरोखर काही हवे असेल, तर संपूर्ण विश्व आपल्याला ते भेटण्यासाठी कट रचते.' यावर प्रतिक्रिया देताना रणवीर सिंग म्हणतो, 'मला विचारा, मी याची हमी देऊ शकतो.'