रणवीर सिंगच्या या खास टीनएज फॅनचा मृत्यू, बाथरूममध्ये घडली दुर्घटना

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 10:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

रणवीर सिंगसाठी त्याचा एक फॅन खूपच खास आहे. काहीच दिवसांपूर्वी या टीएनएज फॅनचा मृत्यू झाला. या बातमीनंतर रणवीर सिंगनेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

ranveer singh with fan
चाहत्यासोबत रणवीर सिंग  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड स्टार्ससाठी त्यांचे चाहते खूप खास असतात. अखेर त्या फॅन्समुळेच आज ते स्टार आहेत. अनेक सेलिब्रेटी आपल्या फॅन्सला खूप स्पेशल पद्धतीने ट्रीट करत असतात तसेच खास फील करण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा करत असतात. दरम्यान, हे फॅन्स जर हे जग सोडून गेले तर त्यांच्या फेव्हरिट स्टार्सनाही तितकेच दु:ख होते. नुकताच रणवीर सिंहच्या सर्वात मोठ्या फॅनचा मृत्यू झाला. 

फोटो जर्नलिस्ट विरल भयानीने याची माहिती दिली आहे. रणवीरचे फॅन जतिन दुलेरा चे बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतचे फोटो शेअर करून त्याने ही माहिती दिली. त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले की रणवीर सिंहचा फॅन जतिन दुलेराचा आकस्मिक अपघातात मृत्यू झाला आहे. तो ऑफिस जाण्यासाठी तयार होत होता मात्र श्वास अडकल्याने तो बाथरूममध्ये पडला. जतिन एक हसमुख मुलगा होता. त्याने लहान वयातच आपल्या वडिलांचा गमावले होते. जतिनवर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे ७०० मित्र उपस्थित होते. 

Ranveer Singh's Instagram story

जेव्हा रणवीरला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जतिनच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. रणवीरने अंतिम श्रद्धांजली वाहताना RIP LIL HOMIE असे लिहिले. तसेच जतिनसोबतचे ४ फोटोजचे कोलाज बनवून अपलोड केले. 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रणवीर सिंह सध्या लंडनमध्ये आपल्या अपकमिंग ८३ या सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा १९८३मध्ये भारत वर्ल्डकप जिंकण्यावर आधारित आहे. या सिनेमात कपिल  देवच्या पत्नीची भूमिका रणवीरची रिअल लाईफ पार्टनर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. तीही यासाठी लंडनमध्ये पोहोचली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
रणवीर सिंगच्या या खास टीनएज फॅनचा मृत्यू, बाथरूममध्ये घडली दुर्घटना Description: रणवीर सिंगसाठी त्याचा एक फॅन खूपच खास आहे. काहीच दिवसांपूर्वी या टीएनएज फॅनचा मृत्यू झाला. या बातमीनंतर रणवीर सिंगनेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
Loading...
Loading...
Loading...